Divyang Employees | PMC Pune | दिव्यांग कर्मचारी आणि नागरिकांशी सलोख्याने वागा | अन्यथा कर्मचाऱ्यांवर होणार प्रशासकीय कार्यवाही 

HomeपुणेBreaking News

Divyang Employees | PMC Pune | दिव्यांग कर्मचारी आणि नागरिकांशी सलोख्याने वागा | अन्यथा कर्मचाऱ्यांवर होणार प्रशासकीय कार्यवाही 

Ganesh Kumar Mule Feb 10, 2023 2:34 PM

Shiv Jayanti | शिवजयंती दिवशी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना महापालिकेत हजर राहणे अनिवार्य
Pension | महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची 519 पेन्शन प्रकरणे प्रलंबित! | खाते प्रमुखांची उदासीनता कारणीभूत | अतिरिक्त आयुक्त कान टोचणार का?
CHS Portal | PMC Health Service | CHS पोर्टल वर माहिती नाही भरली कर्मचाऱ्यांना पत्र दिले जाणार नाही | अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांचा कर्मचाऱ्यांना इशारा

दिव्यांग कर्मचारी आणि नागरिकांशी सलोख्याने वागा

| अन्यथा कर्मचाऱ्यांवर होणार प्रशासकीय कार्यवाही

पुणे | पुणे महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये कार्यरत असलेले दिव्यांग अधिकारी व कर्मचारी तसेच शासकीय कामासाठी कार्यालयामध्ये येणारे दिव्यांग नागरिक यांचेशी कार्यालयीन कामकाज पार पाडताना सलोख्याचे, सौजन्याचे, सौहार्दतेचे व एकोप्याचे वर्तन ठेवावे. असे न झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिला आहे. (PMC Pune)

अतिरिक्त आयुक्त यांच्या निर्देशानुसार भारतीय संविधानाने सर्व नागरिकांसाठी सर्वसमावेशक समाज ज्यामध्ये दिव्यांग व्यक्ती ह्या अशा समाजाचा अभिन्न अंग असेल अशा समाजाची निर्मिती करणे बंधनकारक केलेले आहे. त्यानुषंगाने दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरणासाठी केंद्र शासनाने  दिव्यांग व्यक्ती अधिनियम २०१६ मंजूर करून लागू केलेला आहे. त्यानुषंगाने महाराष्ट्र शासनाने देखील  ‘दिव्यांग व्यक्तींसाठीचे महाराष्ट्र राज्याचे दिव्यांग धोरण, २०१८’ मंजूर केलेले आहे. धोरणामध्ये दिव्यांग व्यक्तींचे अधिकार व त्यांचेबाबत शासन / प्राधिकरण यांनी करावयाची कार्यवाही याबाबत विविध सूचना निर्गमित केलेल्या आहेत.

पुणे महानगरपालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये दिव्यांग अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. पुणे
महानगरपालिका सेवा विनियमातील “नगरपालिका कर्मचाऱ्यांचे वर्तणूक नियम” क्र. २७ मध्ये ‘नगरपालिका
कर्मचाऱ्याने आपल्याहून वरिष्ठ वा कनिष्ठ असलेल्या सहकाऱ्यांसकट सर्वांशी व त्याचबरोबर जनतेशी त्याने
सौजन्याने वागले पाहिजे’, असे निर्देश आहेत. पुणे महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये कार्यरत असलेले दिव्यांग अधिकारी व कर्मचारी तसेच शासकीय कामासाठी कार्यालयामध्ये येणारे दिव्यांग नागरिक यांचेशी कार्यालयीन कामकाज पार पाडताना सलोख्याचे, सौजन्याचे, सौहार्दतेचे व एकोप्याचे वर्तन ठेवावे.

तरी,  आदेशांचे अंमलबजावणीबाबत सर्व महापालिका सहाय्यक आयुक्त / विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांनी आपले अखत्यारीतील कर्मचाऱ्यांना सूचना द्याव्यात व सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करावी. असे आदेशात म्हटले आहे. (pune Municipal corporation)