जागृत राहा : मनपा निवडणुकीबाबत अजित पवारांचे सूचक विधान
पुणे : शहरातील लांबलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्र्यांनी बोलताना सूचक विधान करत शहरातील प्रभाग रचना न बदलता तशीच राहणार आहे. तीन सदस्यांचा प्रभाग राहणार असून ओबीसी राजकीय आरक्षण याबाबत कोर्टाचा निकाल लागल्यानंतरही ताबडतोब निवडणुका लागू शकतात. तेव्हा सर्वांनी जागृत राहा असे विधान यावेळी केले. त्यामुळे निवडणुकीबाबत पुन्हा हालचाली सुरु झाल्या आहेत.
बदलत्या जीवनशैलीचा आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे आजारी पडण्याचं प्रमाण वाढले. असुन उत्तोत्तम आरोग्यासाठी सकस आहार आणि व्यायाम करणे आवश्यक आहे. तसेच रुग्णालयाच्या माध्यमातून शहरातील आरोग्य सुविधाच गुणवत्तापूर्ण भर पडेल. असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. माजी महापौर तथा नगरसेवक दत्तात्रय धनकवडे यांच्या संकल्पनेतून राजीव गांधीनगर परिसरात उभारलेल्या महापालिकेच्या स्व. माणिकचंद नारायणदास दुगड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल लोकार्पण सोहळ्यात पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी शहरातील लांबलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्र्यांनी बोलताना सूचक विधान करत शहरातील प्रभाग रचना न बदलता तशीच राहणार आहे व तीन सदस्यांचा प्रभाग राहणार असून ओबीसी राजकीय आरक्षण याबाबत कोर्टाचा निकाल लागल्यानंतरही ताबडतोब निवडणुका लागू शकतात. तेव्हा सर्वांनी जागृत राहा असे विधान यावेळी केले. व कात्रज पर्यंत मेट्रो लवकरात लवकर काम सुरू होऊन मेट्रो सुरू होईल. यावेळी धनकवडे तसेच दुगड परिवारातर्फे अजित पवार यांचा सन्मान करण्यात आला. प्रस्तावना करताना दत्तात्रय धनकवडे म्हणाले, या भागातील मध्यमवर्गीय नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने येथील आरोग्य सुविधा सक्षम व्हावी यासाठी या रुग्णालयाची उभारणी केली आहे.
अजित पवार म्हणाले की, कोरोनाचे संकट जगासह राष्ट्र,राज्य, परिसरावर आले. अन आपण खळबळून जागे झालो. आरोग्याला जेवढे महत्त्व देऊ, तेवढे पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे आरोग्य सुविधांसाठी महाविकास आघाडी कटिबद्ध आहे. तसेच यावेळी राज्यासाठी काल मांडलेले पंचसूत्री अर्थसंकल्प यातील बाबी मांडल्या. शहरातील अनेक खाजगी हॉस्पिटल मोठ्या प्रमाणात आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांना परवडण्यासारखी महापालकेच्यावतीने रुग्णालय उपलब्ध झाले.तर सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात आरोग्य सेवा मिळतील. मात्र हॉस्पिटल कितीही चांगल्या सुविधा असल्या तरी कोणाला याचा वापर ना करण्याची संधी मिळो. नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे. तसेच डॉक्टरांनी त्याचा अनुभव पणाला लावून रुग्णांचा विश्वास संपादन केला पाहिजे. कार्यक्रमात आमदार चेतन तुपे, रा.कॉ.शहराध्यक्ष प्रशांत जगताप,अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, राज्य महिल आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, माजी उपमहापौर दीपक मानकर, उद्योजक प्रकाश धारीवाल, ओमप्रकाश रांका, प्रमोद दुग्गड, व राष्ट्रवादीचे परिसरातील नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.
COMMENTS