जानेवारीमध्ये 14 दिवस बँका राहणार बंद!
मुंबई : नवीन वर्ष सुरू होण्यासाठी काहीच दिवस बाकी आहे. वर्ष सुरु होण्याआधी भारतीय रिजर्व बँकने (RBI)जानेवारी महिन्यामध्ये सुरू होणाऱ्या बँकेच्या सुट्टयांची (Bank Holidays in January 2022) यादी जाहीर केली आहे. या यादीनसार जानेवारीमध्ये एकूण १४ दिवस बँक बंद राहणारा आहे. त्यामुळे तुमचे कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर ते आताच करून घ्या.
१४ दिवस असेल बँकेच्या सुट्ट्या
जानेवारी 2022 मध्ये एकूण १४ दिवस सुट्ट्यापैकी (Bank Holidays in January) ४ सुट्ट्या रविवारी आहे. यापैकी काही सुट्ट्या लागोपाठ येणार आहे. १४ दिवस संपूर्ण देशामध्ये बँक बंद असणार नाही. RBIने ऑफिशिअल वेबसाईटवर दिलेल्या सुट्टयांची यादीनुसार या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहे. या सर्व सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये लागू केल्या असून सर्व राज्यांमध्ये लागू होणार नाही. तसेच RBI गाईडलाईन्स नुसार रविवार सोडून महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँक बंद राहतील.
या १४ दिवस असेल सुट्टी
1 जानेवारी – देश भरात नवीन वर्षाचा दिवस
2 जानेवारी – देशभरात साप्ताहिक सुट्टी
3 जानेवारी – सिक्किममध्ये नववर्ष आणिलासूंग पर्वनिमित्त सुट्टी
4 जानेवारी – सिक्किम येथील लासूंग पर्वनिमित्त सुट्टी
9 जानेवारी – गुरु गोविंद सिंह जयंतीनिमित्त संपूर्ण देशात सुट्टी , देशभरात साप्ताहिक सुट्टी
11 जानेवारी – मिजोरम
१२ जानेवारी – स्वामी विवेकानंद जयंतीची सुट्टी
14 जानेवारी – मकर संक्रांती निमित्त अनेक राज्यांत सुट्टी
15 जानेवारी – पोंगलनिमित्त आंध्र प्रदेश, पुडुचेरी, तमिलनाडु निमित्त सुट्टी
16 जानेवारी – देश भरात साप्ताहिक सुट्टी
23 जानेवारी – नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती, देशभरात साप्ताहिक सुट्टी
२५ जानेवारी – राज्य स्थापना दिवस निमित्त हिमाचल प्रदेशमध्ये सुट्टी
२६ जानेवारी – गणतंत्र दिवस संपूर्ण देशात सुट्टी
31 जानेवारी – आसममध्ये सुट्टी
COMMENTS