PMP CMD | महापालिकेचा बावधन येथील बंगला पीएमपी सीएमडीना भाडे तत्वावर दिला जाणार 

HomeपुणेBreaking News

PMP CMD | महापालिकेचा बावधन येथील बंगला पीएमपी सीएमडीना भाडे तत्वावर दिला जाणार 

Ganesh Kumar Mule Nov 04, 2022 2:09 AM

Draft DP of 11 villages | PMC Pune | समाविष्ट 11 गावांचा प्रारूप विकास आराखड प्रसिद्ध करण्यासाठी 1 मार्च पर्यंत मुदतवाढ! | शहर सुधारणा समितीची मान्यता
Rehabilitation | Pune Metro | PMC | मेट्रो बाधित कुटुंबाचे पुनर्वसन झाशीची राणी शाळेत!   | महामेट्रोला 30 वर्षासाठी शाळा दिली जाणार भाड्याने 
Fursungi TP Scheme | फुरसुंगी टीपी स्किमचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध करण्यास मुख्य सभेची मान्यता

महापालिकेचा बावधन येथील बंगला पीएमपी सीएमडीना भाडे तत्वावर दिला जाणार

| शहर सुधारणा समितीसमोर प्रस्ताव

पुणे : पीएमपीच्या सीएमडी पदी नुकतीच ओमप्रकाश बकोरिया यांची नियुक्ती राज्य सरकार कडून करण्यात आली आहे. कायद्यानुसार पीएमपी सीएमडीना निवासस्थानाची सुविधा पुरविण्यात येते. त्यानुसार बकोरिया यांनी महापालिकेच्या ताब्यातील बावधन येथील बंगला भाडे तत्वावर देण्याची मागणी केली आहे.  महापालिका प्रशासनाने देखील याबाबत सकारात्मक भूमिका दाखवली असून याबाबतचा प्रस्ताव शहर सुधारणा समिती समोर ठेवला आहे. यावर समितीच्या पुढील बैठकीत चर्चा होईल.

समितीच्या पत्रानुसार  पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकिय संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. यांनी  १४/१०/२०२२ रोजीच्या शासन आदेशानुसार पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकिय संचालक म्हणून नेमणूक केली असल्याचे कळवून त्यांचे निवास स्थानासाठी विषयांकित ठिकाणचा पुणे महानगरपालिकेच्या मालकीचा सद्यस्थितीत रिक्त असणारा बंगला उपलब्ध करून देणेविषयी विनंती केली आहे.  पत्रात त्यांनी मान्य दरानुसार भाडे तत्वावर निवासस्थानाकरीता मिळावा असे नमूद केले आहे. पुणे पेठ बावधन स.नं.२०/३/७+३/८ येथील अॅमेनिटीस्पेसने आरक्षित सुमारे १४९६.१७ चौ.मी क्षेत्राची जागा त्यामधील तळ मजला+पहिला मजला बंगल्याचे बांधकामासहित दि. २५/०९/२०१३ रोजी पुणे महापालिकेच्या ताब्यात आलेला आहे.

मिळकत वाटप नियमावली सन २००८ मधील तरतूदीनुसार पुणे मनपाची मिळकत जास्तीत जास्त १२ महिने पेक्षा कमी कालावधीकरीता भाडे तत्वावर देणेचे अधिकार  महापालिका आयुक्त यांना आहेत. व त्यापुढील कालावधीसाठी मुख्य सभेची मान्यता असणे आवश्यक आहे. सदर बंगला भाड्याने मिळण्याकरीता अद्याप कोणतीही मागणी या विभागाकडे प्राप्त झालेली नाही. सदर बंगल्याचा वापर यापूर्वी अति.महापालिका आयुक्त यांचेमार्फत सुरू होता. सद्यस्थितीत सदर बंगला हा रिकामा आहे. त्यामुळे अ व व्यवस्थापकिय संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. यांनी मागणी केल्यानुसार विषयांकित सुविधा बंगला निवास स्थानासाठी देणे शक्य आहे व त्यामुळे पुणे मनपास आर्थिक उत्पन्न सुध्दा प्राप्त होणार आहे. त्यामुळे हा बंगला दिला जाणार आहे.
प्रस्तावात पुढे म्हटले आहे कि संबंधित बंगल्याची दुरुस्ती आणि साफसफाईचा खर्च पीएमपीला करावा लागणार आहे. शिवाय मान्य दरानुसार भाडे द्यावे लागणार आहे. बकोरिया पदावर असेपर्यंत हा बंगला त्यांना निवासासाठी दिला जाईल.