Balkadu Cartoon Exhibition | MLA Ravindra Dhangekar | बाळासाहेबांच्या विचारांचे बाळकडू राजकारण्यांसाठी गरजेचे | आमदार रवींद्र धंगेकर

HomeपुणेBreaking News

Balkadu Cartoon Exhibition | MLA Ravindra Dhangekar | बाळासाहेबांच्या विचारांचे बाळकडू राजकारण्यांसाठी गरजेचे | आमदार रवींद्र धंगेकर

गणेश मुळे Jan 16, 2024 2:18 PM

Congress | Inflation | महंगाई पे हल्ला बोल काँग्रेसची दिल्लीत रविवारी महारॅली महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्ते सहभागी होणार
Pune Traffic Update | १४ व १५ डिसेंबर रोजी सिंहगड घाटरस्ता वाहतुकीसाठी बंद
Lokvishwas Pratishthan Special Students | लोकविश्वास प्रतिष्ठानच्या विशेष मुलांचा अद्भुत कलाविष्कार .. आणि पुणेकर झाले मंत्रमुग्ध..!

Balkadu Cartoon Exhibition | MLA Ravindra Dhangekar | बाळासाहेबांच्या विचारांचे बाळकडू राजकारण्यांसाठी गरजेचे | आमदार रवींद्र धंगेकर

| बाळकडू व्यंगचित्र प्रदर्शनाचे आ. रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते उद्घाटन

 

Balkadu Cartoon Exhibition |MLA Ravindra Dhangekar | पुणे|  हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख ठाकरे यांच्या जयंती निमित्त व्यंगचित्रकार अमित पापळ यांच्या राजकीय व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी आमदार मोहन जोशी, अभय छाजेड, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, गजाननजी थरकुडे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप, आयोजक अनंत घरत, प्रशांत बधे उपस्थित होते. (Balkadu Cartoon Exhibition |MLA Ravindra Dhangekar)

आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, शिवसेनाप्रमुखांनी सामान्य माणसाला नगरसेवक, आमदार, मुख्यमंत्री केले ही त्यांची ताकद आहे आणि मी त्याचे ऐक उदाहरण आहे, बाळासाहेबांच्या विचारांचे बाळकडू आत्ता राजकारण्यांना तसेच समाज्याला गरजेचे आहे.

या प्रदर्शांनामध्ये तब्बल १५० हून अधिक व्यंगचित्र या प्रदर्शनात पाहायला मिळत आहे. ही व्यंगचित्रे लवकरच पुस्तकरूपी उपलब्ध होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. तीन दिवासीय असणार्‍या या प्रदर्शनास पहिल्याच दिवशी अनेक व्यंगचित्रकारांनी तसेच सामाजिक व राजकीय मान्यवरांनी या प्रदर्शनास भेट दिली.
आयोजक अनंत घरत म्हणाले की, बाळकडू व्यंगचित्र प्रदर्शन म्हणजे या महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाला गलीच्छ राजकारण्यांविषयी आलेला राग असून त्यांच्या व्यक्त झालेल्या भावना आहेत, मशाल पेटवून आजच्या उपक्रमाचे उद्घाटन केले कारण महाराष्ट्रातील प्रदूषित राजकीय अंधार दूर करण्याची वेळ आली आहे.

संजय मोरे म्हणाले की, बाळकडू व्यंगचित्र प्रदर्शन म्हणजे सामान्य माणसाच्या भावना आहेत, शिवसेना नेहमी सत्याच्या बाजूने लढत असते हे बाळकडू शिवसेनाप्रमुखांची देण आहे.

व्यंगचित्रकार अमित पापळ म्हणाले की, व्यंगचित्र ही बोलकी असावी तळागाळातील व्यक्तीला त्यात आपला अनुभव दिसावा, स्वच्छ राजकारण विकासाची दिशा, देशातील एकोपा टिकविण्यासाठी पत्रकारांसोबत व्यंगचित्रकार म्हणून आम्ही जबाबदारीने जनजागृती करीत असतो.