Bajaj Pune Grand Tour | ‘बजाज पुणे ग्रँड टूर’अंतर्गत दुसऱ्या टप्प्याचे २१ जानेवारी रोजी आयोजन | लेडीज कल्ब, कॅम्प येथून सुरूवात; नांदेड सिटी सिंहगड रोड येथे समारोप

Homeadministrative

Bajaj Pune Grand Tour | ‘बजाज पुणे ग्रँड टूर’अंतर्गत दुसऱ्या टप्प्याचे २१ जानेवारी रोजी आयोजन | लेडीज कल्ब, कॅम्प येथून सुरूवात; नांदेड सिटी सिंहगड रोड येथे समारोप

Ganesh Kumar Mule Jan 20, 2026 9:20 PM

Bajaj Pune Grand Tour | ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ च्या अंतिम टप्प्याचे उद्या (२३ जानेवारी) आयोजन
Pune Grand Tour | ‘बजाज पुणे ग्रँड टूर’अंतर्गत पहिल्या टप्प्याचे २० जानेवारी रोजी आयोजन; एकूण अंतर ९१.८ किलोमीटर
Pune Grand Tour With Aamir Khan | बजाज पुणे ग्रँड टूरचा अंतिम टप्पा | त्या क्षणांची छायाचित्रे

Bajaj Pune Grand Tour | ‘बजाज पुणे ग्रँड टूर’अंतर्गत दुसऱ्या टप्प्याचे २१ जानेवारी रोजी आयोजन | लेडीज कल्ब, कॅम्प येथून सुरूवात; नांदेड सिटी सिंहगड रोड येथे समारोप

| देश-विदेशातील नामांकित सायकलपटूंचा सहभाग

Pune Grand Tour 2026 – (The Karbhari News Service) – ‘बजाज पुणे ग्रँड टूर–२०२६’ अंतर्गत टप्पा क्रमांक दोनच्या आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून हा टप्पा बुधवार, दि. २१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजून ३० वाजता लेडीज कल्ब, कॅम्प येथून सुरू होणार असून नांदेड सिटी सिंहगड रोड येथे समारोप होणार आहे. (Pune News)

या टप्प्यात पुणे शहर, पुरंदर आणि राजगड आणि हवेली तालुक्यातून ही रेस जाणार आहे. यास्पर्धेची एकूण एकूण १०९.१५ किलोमीटर आहे. ही स्पर्धा फक्त महाराष्ट्राची नव्हे तर देशाची सर्वात मोठी स्पर्धा असणार आहे. स्पर्धेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याचा इतिहास पुढे येणार आहे असून एक नवीन इतिहास जगासमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्रशासनासोबत स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.

असा असेल स्पर्धेचा टप्पा-२

लेडीज कल्ब, कॅम्प येथून प्रारंभ होऊन गोळीबार चौक, कोंढवा, येवलेवाडी, भिवरी, चांबळी, कोडीत, नारायणपूर, चिव्हेवाडी, केतकावळे, कापूरहोळ, कासुर्डी, मोहरी, जांबळी, आंबवणे, करंजावणे, वांगणी, निघडे, कुसगाव, शिवापूर, कोंढणपूर, सिंहगड घाट रोड, डोणजे, किरकिटवाडी, खडकवासला आणि नांदेड सिटी सिंहगड रोड येथे स्पर्धेचा शेवट होणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: