Bajaj Pune Grand Tour | ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ च्या अंतिम टप्प्याचे उद्या (२३ जानेवारी) आयोजन
Pune News – (The Karbhari News Service) – ‘बजाज पुणे ग्रँड टूर–२०२६’अंतर्गत शुक्रवार, २३ जानेवारी २०२६ रोजी अंतिम टप्प्याचे बालेवाडी ते बाल गंधर्व रंगमंदिर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे, या स्पर्धेची सुरुवात दुपारी १ वाजून ३० वाजता श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे, बालेवाडी येथून होणार असून जंगली महाराज रोडवरील बाल गंधर्व रंगमंदिर येथे शेवट होणार आहे. प्रशासनाने वाहतुकीच्या अनुषंगाने दिलेल्या नियमांचे नागरिकांनी पालन करुन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने नागरिकांना केले आहे. (Pune Grand Tour)
या अंतिम टप्प्यात श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे, बालेवाडी ते जंगली महाराज रोडवरील बाल गंधर्व रंगमंदिर या दरम्यान स्पर्धा होणार असून या स्पर्धेची एकूण ९९.१५ किलोमीटर आहे. यामध्ये नागरिकांना देश-विदेशातील सायकलपटूचे कौशल्य बघण्याची संधी मिळणार असल्याने अधिकाधिक नागरिकांनी स्पर्धा बघण्याकरिता यावे असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
असा असेल स्पर्धेचा टप्पा-४
श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे, बालेवाडी येथून स्पर्धेला प्रारंभ होऊन ती पुढे पाषाण, एनसीएल मैदान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, राजीव गांधी ब्रिज, रक्षक चौक, काळेवाडी चौक, डांगे चौक, संत तुकाराम महाराज ब्रिज, स्वामी विवेकानंद चौक, भक्ती शक्ती चौक, त्रिवेणी नगर चौक, केसबी चौक, टाटा सर्कल, इंद्रायणी चौक, पीसीएनटीडीए चौक, स्पाईन रोड, सिल्वर वाटी चौक, केसबी चौक, एम्पायर इस्टेट, तापकीर चौक, काळेवाडी चौक, रक्षक चौक, राजीव गांधी ब्रिज, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, एनसीसी मुख्यालय, नळस्टॉप चौक, भेलके चौक, नळस्टॉप चौक, लक्ष्मीनारायण चौक, सेव्हन लव्हज चौक, टर्फ क्लब, नॅशनल वॉर मेमोरियल, साधू वासवानी चौक, शनिवारवाडा, साखर संकुल, एफसी रोड आणि जंगली महाराज रोडवरील बाल गंधर्व रंगमंदिर येथे स्पर्धेचा शेवट होणार आहे.

COMMENTS