Baburaoji Gholap College | दिल्लीत होणार्‍या पथसंचलनासाठी राष्ट्रीय छात्र सेनेची छात्र कु. अनुष्का सचिन साठे हिची निवड

HomeपुणेBreaking News

Baburaoji Gholap College | दिल्लीत होणार्‍या पथसंचलनासाठी राष्ट्रीय छात्र सेनेची छात्र कु. अनुष्का सचिन साठे हिची निवड

कारभारी वृत्तसेवा Jan 04, 2024 3:40 PM

Librarian Day | Baburaoji Gholap College | बाबुरावजी घोलप महाविद्यालयात ग्रंथपाल दिवस उत्साहात साजरा
Baburaoji Gholap College | “शांतता, पुणेकर वाचत आहेत” या उपक्रमास बाबुरावजी घोलप महाविद्यालयात उत्स्फूर्त प्रतिसाद 
Gholap College| बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

Baburaoji Gholap College | दिल्लीत होणार्‍या पथसंचलनासाठी राष्ट्रीय छात्र सेनेची छात्र कु. अनुष्का सचिन साठे हिची निवड

 

Baburaoji Gholap College | पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या (PDEA) बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील (Baburaoji Gholap College) राष्ट्रीय छात्र सेनेची छात्र कु. अनुष्का सचिन साठे हिची प्रजासत्ताक दिनाला कर्तव्यपथ (राजपथ) दिल्ली येथे होणाऱ्या संचलनासाठी निवड झाली आहे.
महाराष्ट्रातून १२२ कॅडेटची या संचलनासाठी निवड झाली आहे. त्यात पुणे ग्रुप मधून २९ कॅडेटची निवड झाली असून त्यामध्ये २ महाराष्ट्र बटालियनचे १५ कॅडेटची निवड झाली आहे.

यामध्ये अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपुर, मुंबई अ, मुंबई ब आणि पुणे यांचा समावेश असतो. यात कु. अनुष्का सचिन साठे ही बाबुरावजी घोलप महाविद्यालयाची व २ महाराष्ट्र बटालियन एनसीसी ची छात्र आहे. तिने तीन महिन्यांच्या मेहनतीत दहा दिवसांचे एक शिबीर असे दहा शिबिरे पूर्ण केले आहे. सदर कॅम्पमध्ये मेहनत, परिश्रम व नियमित सराव करून दिल्लीला पोहचली असून पुणे एनसीसी ग्रुप, २ महाराष्ट्र बटालियन एनसीसी पुणे, बाबुरावजी घोलप महाविद्याय तसेच पुणे-पिंपरी चिंचवड शहराचे नाव उंचविले आहे.

राष्ट्रीय पथसंचलनासाठी निवड होणे महाविद्यालयाच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे मत प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी व्यक्त केले. कर्तव्य पथ (राजपथ) दिल्ली येथे होणाऱ्या संचलनासाठी मला संधी मिळणे हे माझ्यासह कुटुंबीयांसाठी गौरवाची बाब आहे, खूप सरावानंतर ही संधी मला मिळाली आहे, त्यामुळे माझे व माझ्या घरच्यांचे स्वप्न पूर्ण झाले असल्याचे छात्र कु. अनुष्का सचिन साठे हिने सांगितले.

एनसीसी युनिट महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष २०१६ मध्ये सुरू झाले असून अनेक छात्रांची सैन्यदल, पोलीसदल व अग्निशामक दलात निवड झाली आहे. तसेच आतापर्यंत पाच छात्रांची कर्तव्य पथ (राजपथ) दिल्ली येथे होत असलेल्या पथसंचलनासाठी निवड झालेली असून आमच्यासाठी कौतुकास्पद व अभिमानाची बाब आहे, अशी माहिती एनसीसी युनिटचे प्रमुख लेफ्टनंट डॉ.विठ्ठल नाईकवाडी यांनी दिली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे, २ महाराष्ट्र बटालियनचे कमाडिंग ऑफिसर कर्नल मंदीप सिंग, अँडमीन ऑफिसर कर्नल सुमेन्तो सेन, एसएम जसपाल सिंग, डीआय इंस्ट्रक्टर विजय सिंग व एनसीसी युनिटचे प्रमुख लेफ्टनंट डॉ.विठ्ठल नाईकवाडी यांच्याकडून छात्र कु. अनुष्का सचिन साठे हिला प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळाले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा.अजितदादा पवार साहेब, उपाध्यक्ष मा.राजेंद्र घाडगे, मानद सचिव मा. अँड संदीप कदम, खजिनदार मा.मोहनराव देशमुख, उपसचिव मा. एल.एम.पवार, सहसचिव मा.ए.एम.जाधव, प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे, उपप्राचार्या डॉ. संगीता जगताप, एनसीसी युनिटचे प्रमुख लेफ्टनंट डॉ.विठ्ठल नाईकवाडी यांनी निवड झालेल्या कॅडेटचे कौतुक करून दिल्लीच्या संचलनास सुभेच्छा दिल्या.