Ashok Vidyalaya Results | अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९९.७३ टक्के  – सलग बारा वर्षे उज्ज्वल यशाची परंपरा

Homeadministrative

Ashok Vidyalaya Results | अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९९.७३ टक्के – सलग बारा वर्षे उज्ज्वल यशाची परंपरा

Ganesh Kumar Mule May 05, 2025 6:18 PM

12 MLAs appointed to Legislative Council | राज्यपालांच्या निर्णयाविरोधात याचिका
Deepak Mankar | Ajit Pawar | Ajit Pawar gave the responsibility of Pune to Deepak Mankar
Wildlife Week | पृथ्वीवर जगण्याचा अधिकार माणसां एवढाच प्राणीमात्रांनाही | वैभव काकडे

Ashok Vidyalaya Results | अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९९.७३ टक्के

– सलग बारा वर्षे उज्ज्वल यशाची परंपरा; गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे पुण्यातील महत्त्वपूर्ण केंद्र

 

HSC Results – (The Karbhari News Service) –  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळ (Maharashtra Vidyarthi sahayak Mandal) संचलित अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने (Ashok Vidyalaya and Junior College) यंदाही आपली गुणवत्ता सिद्ध करत ९९.७३ टक्के निकालाची उज्ज्वल कामगिरी केली आहे. सलग बारा वर्षांपासूनची यशाची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे. (Pune News)

विज्ञान शाखेतील प्रथम तीन गुणवंत:
प्रथम: परब निखिल अजय – ५४२ गुण (९०.३३%)
द्वितीय: रंधवे सार्थक दिनेश – ५३५ गुण (८९.१७%)
ततीय: निंबाळकर राज बिरोबा – ५३० गुण (८८.३३%)

विशेष विषयांतील उल्लेखनीय कामगिरी:
गणित: मंदारपुरकर अर्पिता अतुल – ९७ गुण
जीवशास्त्र: ईशा अमोल वेदपाठक – ९४ गुण
माहिती तंत्रज्ञान (IT):
घारे ऋतुजा वसंत, गुमासे सिद्धी दीपक, ९९ गुण
संगणक शास्त्र: मृदुल दाखलकर – १९८ गुण (२०० पैकी)
इतर शाखांतील यशस्वी विद्यार्थी:
कला विभाग – प्रथम: उजळमकर मिथाली मिलिंद – ८७.५०%
वाणिज्य विभाग – प्रथम: सौंदांकर अंशिता प्रशांत – ८७.००%

या घवघवीत यशामागे संस्थेच्या प्राचार्या उर्मिला भोसले, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी रेखा दराडे, वाणिज्य विभागाच्या इनचार्ज मनीषा मोलावणे यांचे मार्गदर्शन तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक यांचे सहकार्य मोलाचे ठरले आहे.

संस्थेचे अध्यक्ष मोहन जोशी, सचिव प्रसाद आबनावे, खजिनदार प्रथमेश आबनावे, सहसचिव पुष्कर आबनावे, सदस्य प्रज्योत आबनावे, गौरव आबनावे, शीतल आबनावे, विभा कांबळे-आबनावे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.
——-

“गुणवत्तापूर्ण शिक्षण, नैतिक मूल्यांची जपणूक आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारे अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हे पुण्यातील एक महत्त्वपूर्ण व विश्वासार्ह शैक्षणिक केंद्र बनले आहे. संस्थेचा निकाल हे केवळ टक्केवारीचे यश नसून, शिक्षकांची निष्ठा, विद्यार्थ्यांची मेहनत आणि व्यवस्थापनाच्या दूरदृष्टीचे प्रतीक आहे.”

प्रथमेश आबनावे, खजिनदार, महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळ