Ashadhi Wari 2024 | पुणे महापालिकेच्या शाळा दिंड्याना मोफत उपलब्ध करून देण्याची पृथ्वीराज सुतार यांची मागणी

HomeBreaking Newsपुणे

Ashadhi Wari 2024 | पुणे महापालिकेच्या शाळा दिंड्याना मोफत उपलब्ध करून देण्याची पृथ्वीराज सुतार यांची मागणी

गणेश मुळे May 28, 2024 1:02 PM

Pune Water Cut on Friday | देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवताय, तर त्याचे तपशील जाहीर करा
Asha workers’ salary is continuously delayed by the PMC health department!
PMC Building Devlopment Department | कोथरूड परिसरात पुणे महापालिकेकडून हॉटेल्स वर कारवाई | १०३४९ चौ.फूट अनधिकृत बांधकाम हटवले 

Ashadhi Wari 2024 | पुणे महापालिकेच्या शाळा दिंड्याना मोफत उपलब्ध करून देण्याची पृथ्वीराज सुतार यांची मागणी

| महापालिका आयुक्तांकडे मागणी

 

Prithviraj Sutar – (The Karbhari News Service) – पुणे मनपाच्या शाळा (Pune Municipal Corporation Schools) वारकरी दिंडयांना उतरण्यासाठी मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेनेचे (UBT) माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (Palkhi Sohala 2024)

सुतार यांच्या निवेदनानुसार १७ जुलै २०२४ रोजी आषाढी एकादशी आहे. दरवर्षीप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान आळंदी येथून व श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान देहू वरून साधारण पंधरा वीस दिवस आधी होते. या वेळेस हजारो वारकरी दिंडया पालख्यांबरोबर येत असतात. पुणे शहरामध्ये ३० जून व १ जुलै रोजी पालख्यांसोबत येणाऱ्या दिंडयांना राहण्यासाठी संपूर्ण शहरातील विविध भागातील मनपाच्या शाळा मोफत उपलब्ध करून देण्यात याव्यात. ही “शिवसेना पक्षाच्या वतीने आम्ही मागणी करीत आहोत. असे सुतार यांनी म्हटले आहे.