BJP MLA | PMC | लोकप्रतिनिधी म्हणून मला महापालिका कसलाही संपर्क करत नाही! | भाजपच्या आमदारांनी महापालिका आयुक्तांकडे मांडली व्यथा 

HomeपुणेBreaking News

BJP MLA | PMC | लोकप्रतिनिधी म्हणून मला महापालिका कसलाही संपर्क करत नाही! | भाजपच्या आमदारांनी महापालिका आयुक्तांकडे मांडली व्यथा 

Ganesh Kumar Mule Apr 25, 2023 2:15 PM

Pankaja Munde | आम्ही प्रत्येक निवडणूक चुरशीची समजून लढवत असतो | पंकजा मुंडे
Sinhagad Fort | सिंहगड परिसर संवर्धनासाठी ३ कोटी ७५ लाख मंजूर
Municipal Elections | Chandrashekhar Bawankule | NCP | राष्ट्रवादी न्यायालयात गेल्याने महापालिका निवडणुकांना होतोय उशीर 

लोकप्रतिनिधी म्हणून मला महापालिका कसलाही संपर्क करत नाही!

| भाजपच्या आमदारांनी महापालिका आयुक्तांकडे मांडली व्यथा

पुणे | भाजपचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर (BJP MLA Bhimrao Tapkir) यांनी महापालिका आयुक्ताकडे (PMC Commissioner) आपली व्यथा मांडत महापालिकेच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माझा मतदारसंघात व मतदारसंघातील पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या भागामध्ये विकासकामे होत असतांना महापालिका प्रशासनाच्या कुठल्याही खात्याकडून लोकप्रतिनिधी म्हणून मला संपर्क होत नसून विकासकामांची माहिती देखील उपलब्ध करून दिली जात नाही. आमदारांच्या या नाराजीमुळे मात्र प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. (Khadakwasla constituency)

आमदार तापकीर यांनी मनपा आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे कि, खडकवासला विधानसभा मतदारसंघातील विकासकामांच्या नियोजनाबाबत तसेच विविध विषयांच्या अनुषंगाने केलेल्या पत्रव्यवहारात माहिती उपलब्ध करून देण्यात होत असलेला विलंब आणि महानगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा समन्वय नसल्याने याबाबत मी आपल्याकडे सदरच्या पत्राद्वारे तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे. मतदारसंघातील विविध गृहरचना संस्था, इमारती, वस्ती भागातील नागरिक सतत पाठपुरावा करीत असतांना त्यांना त्यांच्या समस्यांशी निगडीत प्रश्नांवर चर्चा करतांना प्रशासनाकडून वेळेत माहिती उपलब्ध होत नसल्याने अडचणी येत आहेत. आपण याची
दखल घेऊन आपल्या खातेप्रमुखांना लोकप्रतिनिधी म्हणून समन्वय साधत विकासकामांचे नियोजन होत असतांना त्याची सर्व माहिती उपलब्ध करून देत केलेल्या पत्रव्यवहारात तत्काळ माहिती उपलब्ध करून देत समन्वय ठेवण्याचे आदेश कराल अशी आशा करतो. आणि वर्ष २०२३-२४ अंदाजपत्रक (अ+क) मध्ये खडकवासला विधानसभा मतदारसंघात व
मतदारसंघातील पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ठ झालेल्या भागामध्ये पुणे महानगरपालिकेच्या वतीने किती निधी मंजूर करण्यात आला व कोणकोणत्या कामांसाठी याबाबत सविस्तर माहिती तत्काळ उपलब्ध करून दयावी. अशी मागणी आमदार तापकीर यांनी आयुक्तांकडे केली आहे.