विधवा, निराधार व अपंग महिलांना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत अरुण पवार यांच्या हस्ते पेन्शन पत्राचे वाटप
पिंपरी : समाजातील विधवा, निराधार व अपंग महिलांना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत पेन्शन सुरू करण्यासाठी मराठवाडा जनविकास संघ प्रयत्नशील असून, 39 लाभार्थी महिलांना अध्यक्ष अरुण पवार यांच्या हस्ते पेन्शन पत्राचे वाटप करण्यात आले. संस्थेमार्फत या योजनेंतर्गत नोंदणी केलेले 42 लाभार्थी यापूर्वी लाभ घेत आहेत.
मराठवाडा जनविकास संघामार्फत गरजू पात्र व्यक्तिंना या योजनेतून लाभ मिळवून देण्यासाठी काम सुरू असून, कुणीही या योजनेपासून वंचित राहू नये, हा या पाठीमागचा उद्देश आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी काय कागदपत्रे लागतात, फॉर्म कसा व कुठे जमा करायचा याबाबत माहिती नसते. त्यामुळे अनेक पात्र लाभार्थी शासनाच्या या योजनेपासून वंचित राहतात. मराठवाडा जनविकास संघाचे कार्यकर्ते विजय वडमारे हे चिंचवड, पिंपरी व भोसरी विधानसभा मतदारसंघात या योजनांबाबत गरजूंना वेळोवेळी मार्गदर्शन करतात. गरजू विधवा, निराधार, अपंग महिलांना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने त्यांचे फॉर्म भरून घेऊन ते कागदपत्रांसह आकुर्डी येथील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात जमा करण्यात आले होते.
यापुढेही या योजनेतून गरजूंना मदत मिळावी, यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. ज्या गरजूंचे बँकेत खाते नाही, अशांचे बँक खाते उघडून देण्यासाठीही संस्थेमार्फत मदत करण्यात येत आहे. सर्व लाभार्थ्यांचे बँकेचे फॉर्मही भरून घेण्यात आले आहेत. ज्या गरजूंना या योजनेचा अद्याप लाभ घेता आला नाही, त्यांनी मराठवाडा जनविकास संघाच्या कार्यालयाशी किंवा विजय वडमारे यांच्याशी 9503447000 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांनी केले आहे.
COMMENTS