गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन; सक्ती नाही
: आरोग्य मंत्र्यांचे स्पष्टीकरण
राज्यात काही भागांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मास्क सक्ती करण्यात आल्याचं वृत्त दिलं होत. पण कोणत्याही प्रकारे मास्क सक्ती करण्यात आलेली नाही. मास्क वापरण्याचं केवळ आवाहन करण्यात आलं आहे, असं स्पष्टीकरण आरोग्य मंत्री राजेश टोपे (health minister Rajesh Tope) यांनी दिलं आहे.
माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. आरोग्य सचिवांनी काढलेल्या पत्रकामध्ये मास्क घालणं हे मस्ट (Must) असं म्हटलं आल्यानं राज्यात मास्कसक्ती करण्यात आल्याचा सर्वांचा समज झाला. पण हा मस्ट शब्द सक्ती असा न वाचता केवळ मास्क वापरण्याचं आवाहन असा वाचून मीडियानं लोकांना सांगावं. त्यामुळं मास्क नसल्यास कोणतीही दंडात्मक कारवाई होणार नाही, असंही आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.टोपे म्हणाले, आपल्या राज्यात काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या थोड्या प्रमाणात वाढत आहे. यामध्ये मुंबई, पुणे, पालघर आणि रायगड, ठाणे आहे. यामध्ये जी संख्या वाढत आहे. त्या संख्येमुळं केंद्रीय आरोग्य विभागानं आम्हाला एक पत्र पाठवलं की या जिल्ह्यांपुरत्या तुम्हाला उपाययोजना कराव्या लागतील. याबाबतीत परवा टास्कफोर्सच्या बैठकीत हे ठरलं, आपण मास्क वापरण्याचं आवाहन करावं ते सक्तीचं असू नये. त्यामुळं दहा पंधरा दिवस जी वाढ दिसून येत आहे, त्यानुसार बंद ठिकाणं जसं की बसेस, रेल्वे, शाळा, कार्यालये असतील तिथं मास्क वापरावं. खुल्या ठिकाणी त्याला शिथिलता असली तरी हरकत नाही. त्याला जोडून लसीकरण करा, बूस्टर डोस घ्यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
सर्वात महत्वाचं म्हणजे टेस्टिंग वाढवण्याच्या सूचना आरोग्य विभागाच्यावतीनं महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.डिग्री नसलेल्या कथीत डॉक्टरांवर कडक कारवाई होणारडिग्री नसलेले, लायसन्स नसलेले जे लोक वैद्यकीय व्यवसाय करत आहेत त्यांच्यावर कडक आणि सक्तीनं कारवाईच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अशा लोकांवर फौजदारी कारवाया झाल्या पाहिजेत असंही त्यांना सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात मी गृहमंत्र्यांनाही विनंती करणार आहे.
COMMENTS