Students of Dhangar community | धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेशासाठी आवाहन

HomeपुणेBreaking News

Students of Dhangar community | धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेशासाठी आवाहन

Ganesh Kumar Mule Jun 02, 2022 9:45 AM

Video | PMC Pune River Revival Project | पुणे मनपाकडून खुलासा करण्यासाठी अधिक्षक अभियंता यांचा व्हिडिओ प्रसारित
  Traffic in Mundhwa Chowk smooth!  | PMC Additional Commissioner Vikas Dhaknes Information
Mohan Joshi | कसब्यातील काँग्रेसच्या विजयामुळेच झुकला भाजप | मोहन जोशी

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेशासाठी आवाहन

पुणे : धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या अनुषंगाने भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण घेण्यासाठी पुणे जिल्ह्यातील समर्थ ज्ञानपीठ संस्था, सोमेश्वरनगर, ता. बारामती संचलित सह्याद्री पब्लिक स्कूल, बाघळवाडी, ता. बारामती या शाळेची निवड करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. इच्छुकांनी या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन समोर, आळंदी रोड, पुणे व शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0