Street vendors will be charged : मंडई व्यतिरिक्त रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्याकडून प्रतिदिन 50 रु शुल्क आकारले जाणार    : महापालिकेचे जाहीर प्रकटन 

HomeBreaking Newsपुणे

Street vendors will be charged : मंडई व्यतिरिक्त रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्याकडून प्रतिदिन 50 रु शुल्क आकारले जाणार  : महापालिकेचे जाहीर प्रकटन 

Ganesh Kumar Mule Apr 01, 2022 7:05 AM

Encroachment action started : अतिक्रमण कारवाई सुरु : पहिली कारवाई रास्ता पेठेतील भाजी मंडई वर 
Encroachment action started : अतिक्रमण कारवाई सुरु : पहिली कारवाई रास्ता पेठेतील भाजी मंडई वर 
Rents of Mandi | मंडईतील गाळ्यांच्या भाडेवाढी विरोधात सर्व राजकीय पक्ष एकवटले | भाडेवाढ कायद्याच्या कसोटीवर अमान्य असल्याचा दावा 

मंडई व्यतिरिक्त रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्याकडून प्रतिदिन 50 रु शुल्क आकारले जाणार

: महापालिकेचे जाहीर प्रकटन

पुणे : शहरातील अधिकृत मंडई व्यतिरिक्त भाजी मंडईच्या परिसरात सार्वजनिक रस्त्यावर बसून व्यवसाय करणा-या भाजी विक्रेते व शहरातील इतर ठिकाणच्या व्यावसायिकांकडून कचरा निर्मुलन आकार अथवा प्रशासकीय शुल्कापोटी प्रतिदिन ५०/- रू याप्रमाणे वसुली करण्यात येणार आहे. याबाबत महापालिकेने जाहीर प्रकटन दिले आहे.

: काय आहे जाहीर प्रकटन?

तमाम नागरिकांना या जाहीर प्रकटनाद्वारे कळविण्यात येते की, पुणे शहरातील अधिकृत मंडई व्यतिरिक्त भाजी मंडईच्या परिसरात सार्वजनिक रस्त्यावर बसून व्यवसाय करणा-या भाजी विक्रेते व शहरातील इतर ठिकाणच्या व्यावसायिकांकडून कचरा निर्मुलन आकार अथवा प्रशासकीय शुल्कापोटी प्रतिदिन र.रु.५०/- याप्रमाणे वसुली करणेस मा.स्थायी समिती ठ.क्र. १६६७,दि. १७/१२/२०१२ मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार पुणे शहरातील अधिकृत मंडई व्यतिरिक्त मंडईच्या परिसरात सार्वजनिक रस्त्यावर बसून व्यवसाय/विक्री करणा-या व्यावसायिकांकडून कचरा निर्मुलन आकार अथवा प्रशासकीय शुल्कापोटी प्रतिदिन र.रु.५०/- याप्रमाणे वसूल करण्यात येत आहे. याची नोंद घ्यावी.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0