पुण्यातील अँटीजेन किट भ्रष्टाचाराची होणार चौकशी | आमदार सुनील टिंगरे यांच्या प्रश्नावर आरोग्यमंत्र्यांचे आश्वासन
पुण्यातील बहुचर्चित अँटीजेन घोट्याळ्याची चौकशी राज्य सरकारकडून केली जाणार आहे. याबाबत राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. यावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आश्वासन दिले कि याची चौकशी करून अहवाल सादर केला जाईल.
याबाबत टिंगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे शहरात ४ डिसेंबर २०२२ मध्ये उघडकीस आलेल्या एंटिजन किट भ्रष्टाचारासंदर्भात मी अधिवेशनात प्रश्न केला. आरोग्यमंत्री या प्रकरणाची सखोल चौकशी करणार का?, दोषींवर कारवाई केली जाणार का? या प्रकरणात जो लाखो रुपयांच्या घोटाळा झाला आहे त्याची संबंधितांकडून वसुली केली जाणार का? असे मुद्दे उपस्थित केले. त्यावर आरोग्यमंत्री सावंत यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून एक महिन्यात अहवाल सादर केला जाईल व दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. असे आमदार टिंगरे म्हणाले.