पुण्यात अजून एक कंपनी तयार करणार कोविड १९ वरील लस!
: महापालिकेकडे केली पाण्याची मागणी
पुणे : कोविड वरील परिणामकारक कोविशिल्ड लस तयार करण्याचा मान पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ने मिळवला आहे. आता ही लस जगभरात वितरित होत आहे. त्यांनतर देशात वेगवेगळ्या लस आल्या. दरम्यान पुण्यात अजून एक कंपनी लस तयार करणार आहे. बायोवेट नावाची कंपनी मांजरी मधेच कोविड वरील लस तयार करणार आहे. कोविड शिवाय इतर ही लशी ही कंपनी तयार करणार आहे. त्यासाठी या कंपनीने महापालिकेकडून वितरित केल्या जाणाऱ्या पाण्याची मागणी केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिकेला पत्र लिहित हे पाणी उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे.
: मांजरी खुर्द मध्ये तयार होणार लस
बायोवेट प्रायवेट लिमिटेड ही कंपनी पुण्याजवळील मांजरी खुर्द मध्ये लस तयार करणार आहे. त्यासाठीची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. हाय कोर्ट ने देखील यास हिरवा कंदील दाखवला आहे. त्यानुसार कंपनी लवकरच ही लस तयार करेल. कोविड शिवाय इतर ही लशी ही कंपनी भविष्यात तयार करणार आहे. यासाठी कंपनी सद्यस्थितीत बोअर चे पाणी वापरत आहे. मात्र त्या पाण्यातील कठीनता आणि TDS च्या ज्यादा प्रमाणामुळे यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठी कंपनीने महापालिकेकडून वितरित केल्या जाणाऱ्या पाण्याची मागणी केली आहे.
दररोज ६०-७० हजार लिटर पाण्याची आवश्यकता
कंपनीला दररोज ६०-७० हजार लिटर पाण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच दररोज ६-८ Tanker ची आवश्यकता भासणार आहे. कारण कंपनी ज्यादा प्रमाणात इंजेक्शन तयार करणार आहे. कंपनी ने ही मागणी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेला पत्र लिहित हे पाणी संबंधित कंपनीला उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. महापालिकेला देखील हे पाणी उपलब्ध करून द्यावे लागणार आहे.
COMMENTS