व्हॉईस आॅफ मिडीयाच्या वतीने पुरस्कारांची घोषणा़
| सकारात्मक पत्रकारीता जोपासण्याचा संघटनेकडून प्रयत्ऩ
परभणी : सकारात्मक पत्रकारिता ही मराठी पत्रकारितेची विचारधारा आहे, हे विचार रुजवण्यासाठी व्हॉईस आॅफ मीडिया संघटनेने या वर्षीपासून व्हॉईस आॅफ मीडिया पॉझिटिव्ह जर्नालिझम पुरस्कार सुरू केला आहे. यात रोख अडीच लाख रुपयांचे चार पुरस्कार तसेच विशेष पाच पुरस्कार व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार असल्याची माहिती व्हॉईस आॅफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांनी शनिवार, दि़२८ जानेवारी रोजी निरज हॉटेल येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली़
लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठी हे ब्रीद वाक्य घेऊन काम करीत असलेल्या व्हॉईस आॅफ मीडिया या देश पातळीवरील पत्रकार संघटनेचे १८ हजार सदस्य असून २३ राज्यात ही संघटना सक्रिय आहे. सकारात्मक पत्रकारिता वाढावी यासाठी संघटनेच्या वतीने यावर्षी पासून अडीच लाख रुपयांच्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे स्वरूप प्रथम बक्षीस रोख १ लाख रुपये, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, मानपत्र, सन्मान, द्वितीय ६१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, मानपत्र, सन्मान, महिला पत्रकार ५१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, मानपत्र, सन्मान तृतीय क्रमांक ४१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, मानपत्र, सन्मान असे आहे. उत्तेजनार्थ पाच विशेष पुरस्कार देण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. दैनिक, साप्ताहिक, मासिक, इलेक्ट्रॉनिक्स मिडीयाचे प्रतिनिधी यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. प्रस्ताव देताना संपादकांचे पत्र जोडणे आवश्यक आहे. १ फेब्रुवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये किमान ४२ किंवा त्यापेक्षा अधिक थेट परिणामकारक असणाºया सकारात्मक बातम्या, लेख या स्पर्धेसाठी ग्राह्य धरल्या जातील. महाराष्ट्र व मराठी भाषेपुरतीच ही स्पर्धा असणार असून जानेवारी २०२४ मध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे विजेत्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. व्हॉईस आॅफ मीडिया कोकण विभागीय कार्यालय एल. ३०- १२०१ – स्वप्नपूर्ती, सेक्टर ३६ खारघर, नवी मुंबई ४१०२१० या पत्त्यावर प्रस्ताव पाठवावेत असे आवाहन त्यांनी केले. या स्पर्धेत संघटनेच्या सर्वच ठिकाणचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव यांना सहभागी होता येणार नसल्याचेही संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. ही स्पर्धा संघटने बाहेरील पत्रकारांसाठी सुद्धा असणार आहे. जिल्ह्यातील पत्रकारांनी सकारात्मक बातम्या लिहून या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन व्हाईस आॅफ मीडियाचे राज्य सहसरचिटनिस डॉ.ज्ञानेश्वर भाले, राज्य कार्यवाहक सूरज कदम, मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया आणि परभणीचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष प्रविण चौधरी यांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे अक्षय मुंडे, कैलास चव्हाण, विजय कुलकर्णी, प्रदीप कांबळे, मोईन खान, सुशील गायकवाड, मोहन धारासुरकर, प्रसाद जोशी, अमोल लंगर आदींची पत्रकार परिषदेस उपस्थिती होती़