Annasaheb Waghire College Otur | भारत सर्वात जास्त बोली भाषा बोलणारा देश : डॉ.रमेश गोपाळे

Homeadministrative

Annasaheb Waghire College Otur | भारत सर्वात जास्त बोली भाषा बोलणारा देश : डॉ.रमेश गोपाळे

Ganesh Kumar Mule Feb 24, 2026 8:56 PM

Annasaheb Waghire College Otur | ओतूर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सुदंरराव ढाकणे यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ साजरा
Waghire College | वाघिरे महाविद्यालयाच्या पदार्थ विज्ञान विभागातील माजी विद्यार्थ्यांचा  स्नेहमेळावा संपन्न 
Annasaheb Waghire College Otur | किशोरवयीन मुला-मुलींचे खरे मित्र हे आई-वडील | डॉ. अनुष्का शिंदे

Annasaheb Waghire College Otur | भारत सर्वात जास्त बोली भाषा बोलणारा देश : डॉ.रमेश गोपाळे

Pune News – (The Karbhari News Service) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर,येथे “जागतिक मातृभाषा दिन” मोठ्या आनंदी वातावरणात संपन्न झाला.अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश शिरसाट व मराठी विभाग प्रमुख डॉ.वसंत गावडे यांनी दिली.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती पूजनाने व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.राजेश रसाळ यांनी केले.ते म्हणाले,”जगातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या मातृभाषेचा अभिमान वाटतो.त्यातूनच त्याच्या वर संस्कार होतात”

डॉ.रमेश शिरसाट अध्यक्षीय मनोगतात म्हणाले,”मातृभाषेचा अभिमान बाळगून तिचे जतन व संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.” विद्यार्थी प्रतिनिधी अर्णव बेनके व सूरज राजुरे यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने मनोगत व्यक्त केले.

या निमित्त डॉ.रमेश गोपाळे यांच्या “मराठीच्या विविध बोली ह्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.ते म्हणाले,”भारत सर्वात जास्त बोलीभाषा बोलणारा देश आहे. मातृभाषेचा वसा आणि वारसा पुढील पिढीसाठी मार्गदर्शक आहे. आपले आपल्या आईवर जेवढे प्रेम असते. तेवढेच मातृभाषेवर ही प्रेम करा.”असा संदेश त्यांनी दिला.

उपप्राचार्य डॉ.कल्याण सोनावणे डॉ. निलेश काळे,डॉ.रमेश काशिदे, प्रा.विद्या कोठावळे, प्रा.जनार्दन नाडेकर प्रा. अंकुश मोध्ये.राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र अंबावणे हे उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.रोहिणी मदने यांनी केले. आभार डॉ. विनायक कुंडलिक यांनी मानले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: