Annasaheb Waghire College | A Grade |अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयास A मानांकन | नॅक कमिटीची भेट
Annasaheb Waghire College | A Grade | २९ व ३०/११/ २०२३ रोजी अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयास नॅक पिअर टीमने भेट दिली. दरम्यान अध्ययन,अध्यापन, संशोधन, पायाभूत सुविधा आणि एकूणच शैक्षणिक गुणवत्ता या सर्व बाबींची पाहणी व अभ्यास करून महाविद्यालयास”A”ग्रेड प्रदान करण्यात आली. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अभय खंडागळे, उपप्राचार्य डॉ.के.डी.सोनावणे , उपप्राचार्य,नॅक व आय. क्यू.ए.सी समन्वयक डॉ.व्ही.एम.शिंदे, प्रसिद्धी विभागाच्या वतीने महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य डॉ.वसंत गावडे यांनी दिली. (Annasaheb Waghire College | A Grade)
या भेटी दरम्यान समितीने महाविद्यालयातील विविध विभागांना भेटी देऊन पाहणी केली. प्राध्यापकांचे संशोधन कार्य, महाविद्यालयाने विविध संस्थांबरोबर केलेले सामंजस्य करार, प्राध्यापकांना व महाविद्यालयास मिळालेले विविध पुरस्कार,विविध समाज उपयोगी उपक्रम, विद्यार्थी कल्याण मंडळाचे उपक्रम, महाविद्यालयाचा प्लेसमेंट सेल, ग्रंथालयाची प्रगती, राष्ट्रीय सेवा योजना, एन सी.सी, क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य, सांस्कृतिक कार्यक्रम, सौर ऊर्जा, गांडूळ खत प्रकल्प, रेन हार्वेस्टिंग, महाविद्यालयातील औषध उपयोगी झाडे, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा, विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठी असलेली वसतीगृहाची सोय, आजी-माजी विद्यार्थी व पालकां बरोबर झालेला सुसंवाद. या बाबी महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार साहेब,उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे साहेब,सचिव मा.संदीप कदम, खजिनदार मा.मोहनराव देशमुख,सहसचिव मा. एल.एम.पवार, सहसचिव प्रशासन मा. ए.एम.जाधव यांनी अभिनंदन केले आहे.