श्री.लक्ष्मीमाता मंदिरात तीन हजार हापूस आंब्यांची आकर्षक आरास
| भक्तिमय वातावरणात दर्शनासाठी भाविकांची रीघ
अक्षय्य तृतीयेनिमित्त शिवदर्शन येथील प्रसिद्ध श्री लक्ष्मीमाता मंदिरात सुमारे ३ हजार हापुस आंब्यांची आरास आणि फुलांची आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई करण्यात आली होती. भक्तिमय वातावरणात भाविकांची दर्शनासाठी रीघ लागल्याचे चित्र होते.
पुणे नवरात्रौ महोत्सवाचे अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल , पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांच्या उपस्थितीत श्री. लक्ष्मीमाता देवीची आरती करण्यात आली.यावेळी देवीच्या चरणी तीन हजार हापुस आंबे अर्पण करण्यात आले.
दुपारी चारनंतर पारंपारिक वाद्यांच्या गजरात छबिना आणि मिरवणुकीनंतर भाविकांना प्रसादस्वरूपात आंब्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी घनश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, अमित बागुल, हेमंत बागुल ,कपिल बागुल ,सागर बागुल, सागर आरोळे, महेश ढवळे, बाबालाल पोळके, संतोष पवार, समीर शिंदे, आदींसह पदाधिकारी- कार्यकर्ते उपस्थित होते. दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होती.