प्रारूप मतदार याद्यामुळे संभ्रमाचे वातावरण!
😐 इच्छुकांचे टेन्शन वाढले
पुणे महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्या करताना एका प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागात टाकणे, काही याद्या गायब होणे असे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. धायरी आंबेगाव प्रभाग क्रमांक ५४ मध्ये तर तब्बल १ लाखापेक्षा जास्त मतदारांचा प्रभाग झाल्याने इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत. या मतदार याद्या दुरुस्त करण्याची मागणी केली जात आहे. मुळात मतदार याद्या उशिरा प्रसिद्ध केल्या. ज्या केल्या त्यामुळे संभ्रम वाढलाच आले.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार याद्या जाहीर केल्या आहेत. त्यावर १ जुलैपर्यंत हरकती सूचना नोंदविता येणार आहेत. प्रभाग रचना अंतिम झाली तरी ल्याने राजकीय पक्ष, इच्छुकांकडून प्रभागाचा अभ्यास सुरू आहे. ज्या ठिकाणी हक्काचे मतदान आहे त्यासह अवघड भाग कोणता तेथे लक्ष घालत आहेत. पण प्रारूप मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिरूर मतदारसंघातील व पुणे महापालिकेच्या हद्दीबाहेरील वढू या गावातील १२५ पेक्षा जास्त मतदारांचा समावेश प्रभाग क्रमांक दोनमध्ये करण्यात आला आहे. अनेक प्रभागाच्या सीमेवरील मतदारांची विभागणी होण्याऐवजी प्रभागाच्या मध्य भागात असलेले मतदार दुसऱ्या प्रभागात टाकले आहेत. प्रभाग क्रमांक ३६ कर्वेनगर येथील सोसायट्यांमधील मतदार प्रभाग क्रमांक १६ फर्ग्युसन महाविद्यालय- एरंडवणे येथे जोडले आहेत. प्रभाग क्रमांक शनिवार पेठे-नवी पेठेतील काही मतदार प्रभाग क्रमांक ५२ सनसिटी-नांदेड सिटीमध्ये टाकले आहेत. एका मतदारयादीत १ हजार ते १२०० मतदार असतात. काही प्रभागात चार ते पाच तर काही प्रभागात १० ते १५ मतदारयाद्या दुसऱ्या प्रभागात केले आहेत. अशा प्रकारे बहुतांश सर्वच प्रभागातील याद्यांमध्ये घोळ झाला आहे. प्रभाग रचनेत आपल्या सोईचा प्रभाग झाला असे वाटणाऱ्या इच्छुकांचे हक्काचे मतदार गायब झाल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत.
—