Amol Balwadkar | जाणीवपूर्वक आत्मसन्मानाला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न- अमोल बालवडकर | भाजपवर विश्वास; पक्षाची संस्कृती अशी नाही

HomeBreaking News

Amol Balwadkar | जाणीवपूर्वक आत्मसन्मानाला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न- अमोल बालवडकर | भाजपवर विश्वास; पक्षाची संस्कृती अशी नाही

Ganesh Kumar Mule Oct 03, 2024 6:44 PM

Mahalunge TP Scheme : प्रत्येक शेतकऱ्याला टीपी स्कीमचा निश्चितपणे फायदा होणार  : पीएमआरडीए आयुक्त सुहास दिवसे यांचे प्रतिपादन
Pandharpur Wari| अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या वारकरी सेवेची २९ वर्षे!
Amol Balwadkar : Hina Gavit : खासदार हिना गावित यांची नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या बाणेर जनसंपर्क कार्यालयास भेट 

Amol Balwadkar | जाणीवपूर्वक आत्मसन्मानाला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न- अमोल बालवडकर | भाजपवर विश्वास; पक्षाची संस्कृती अशी नाही

| पक्षश्रेष्ठींनी वेळीच या गोष्टींना आळा घालावा

 

Amol Balwadkar Vs Chandrakant Patil – (The Karbhari News Service) – पक्षावर नाराजी नाही. मात्र काही नेते आणि त्यांचे ऐकणारे कार्यकर्ते हे जाणीवपूर्वक माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या आत्मस्मानाला धक्का पोहोचवत आहेत. अन्याय विरुद्ध लढले पाहिजे अशी शिकवण आई-वडिलांनी दिली आहे. म्हणून गेले दोन महिने प्रत्येक गोष्ट मागे टाकली. पक्षावर विश्वास आहे. पक्षाची संस्कृती अशी नाही. पक्षावर माझा विश्वास आहे. मात्र अशा गोष्टींना वेळीच पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवलया पाहिजे म्हणून माझ्या भावनांना वाट मोकळी करून दिली असे शहर सुधारणा समितीचे माजी अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. (Amol Balwadkar Pune BJP)

अमोल बालवडकर याबाबत पत्रकार परिषदेत म्हणाले, निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्त्याने इच्छा व्यक्त करणे हा पक्षातील लोकशाहीचा भाग आहे. परंतु, उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत मंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी इच्छुक कार्यकर्त्यांच्या आत्मसन्मानाला धक्का पोहचवला आहे. दबाव कार्यपद्धतीचा अवलंब केल्याचा आरोप करत माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केला आहे. गेल्या दोन महिन्यापासून पक्षामध्ये चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मानसन्मान तर नाही, मात्र बहिष्कृतपणाची वागणूक दिली जात आहे . आमच्या कार्यक्रमांनाकार्यकर्त्यांनी जायचे नाही असे निरोप सांगितले जातात. त्यावर कहर म्हणजे आमचे निरीक्षक भागवत कराड हे कोथरूड मतदार संघामध्ये आले असता आम्हाला निरोप देण्यात आले नाही. नाव घेऊन अमोल बालवडकर आणि श्याम देशपांडे यांना मतदारसंघातील उमेदवार निवडीसाठी प्रेक्षकांच्या उपस्थितीत बोलावले जाऊ नये असा निरोप देण्यात आला. त्यामुळे पत्रकार परिषद घेऊन या गोष्टींना सांगावे लागत आहे.

बालवडकर पुढे म्हणाले मी गेल्या दहा वर्षापासून भाजपचे काम करत आहे. कोथरूडमध्ये भाजपचे 50 हजार सभासद मी केले आहेत. या भागात काम करत असताना नागरिकांकडून काही अपेक्षा असतात त्या आपण पूर्ण कराव्या लागतात. नागरिक कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे की मी विधानसभेच्या रणांगणात उतरावे जेणेकरून या भागातील प्रलंबित प्रश्न सोडवले जावेत. नागरिक, कार्यकर्त्यांच्या भावनांपुढे मला झुकावे लागले आणि इच्छुक म्हणून या विधानसभेत मी समोर आलो. यात माझी चूक काय झाली. ज्यावेळी मी कोथरूड विधानसभेसाठी इच्छुक आहे हे समोर आले त्या दिवसापासून मला चंद्रकांत पाटील यांच्याकडून अतिशय वेगळी वागणूक दिली जात आहे. अक्षरशः मला बहिष्कृत केले आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही, पक्षाचे व्यासपीठ पक्षाचा झेंडा आणि समोर हजारो नागरिक अशी परिस्थिती असताना माझ्या कार्यक्रमाला भाजपचे एकही पदाधिकारी येत नाहीत हे एक प्रकारे मला बहिष्कृत करण्यासारखेच आहे . अन्याय विरोधात लढले पाहिजे अशी शिकवण मला आई-वडिलांनी दिली आहे. म्हणूनच आज माझ्या भावनांना वाट मोकळी करून दिली. मान सन्मान नाहीच पण बहिष्कृत वागणूक देणे ही भाजपची संस्कृती नाही . पक्षावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मला आशा आहे पक्षश्रेष्ठी याबाबत योग्य तो निर्णय घेतील.

बालवडकर म्हणाले, कार्यकर्ता निडर असावा. चुकीचं काही होत असेल तर ते मांडणारा असावा. पक्षाबद्दल काही मत नाही. परंतु काही व्यक्तींबद्दल तक्रार आहे. काल निरीक्षक आले होते. तेथे मोजक्याच पदाधिकाऱ्यांना निरोप पाठवण्यात आले होते. हा वाजपेयींचा पक्ष आहे. कोथरूड मधील नेते खूप मोठे आहेत. त्यांच्याबाबत कोणत्या वरिष्ठांकडे जायचे हा प्रश्न असल्याने माध्यमातून हि परिस्थिती मांडत आहे. गिरीश बापट साहेब असते तर हा प्रकार झाला नसता.

———————————-

कार्यकर्ता काम करत असतो. मी दोन महिन्यांपासून तयारी करत आहे. परंतु कालच्या प्रक्रियेत मला बहिष्कृत केले गेले. चंद्रकांत पाटील माझ्या कार्यक्रमाला येत नाहीत. दुसऱ्या पदाधिकाऱ्यांना देखील त्यांनी माझ्या कार्यक्रमाला येवू नये यासाठी दबाव टाकतात. इच्छुक होणे हा गुन्हा आहे ? मला भविष्याची चिंता नाही. आत्मसन्मान दुखावला जात असेल तर तो मांडला पाहिजे. मी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि रावसाहेब दानवे यांना देखील कळविले आहे. परंतु त्यांच्याकडून अद्याप निरोप मिळाला नाही. चंद्रकांत पाटील यांच्याकडून पक्षाची लोकशाही संपवण्याचा प्रयत्न होत आहे त्याचा निषेध करतो. पक्षाचा सर्वे गोपनीय होता. परंतु तो लीक केला आहे. खरा सर्वे जनतेचा आहे. मी कोथरूड मध्ये सर्वे केला आहे. ३५ हजार कुटुंबीयांना संपर्क केला आहे. त्यामध्ये बहुतांश नागरिकांनी मला पसंती दिली आहे. निरीक्षकांनी हा सर्वे पहावा

अमोल बालवडकर, माजी अध्यक्ष, शहर सुधारणा समिती

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0