Ambegaon Garbage Project | आंबेगाव कचरा प्रकल्प | प्रदूषण मंडळाकडे १२ लाख ३० हजार येत्या २ महिन्यात जमा करावे लागणार

HomeBreaking Newsपुणे

Ambegaon Garbage Project | आंबेगाव कचरा प्रकल्प | प्रदूषण मंडळाकडे १२ लाख ३० हजार येत्या २ महिन्यात जमा करावे लागणार

Ganesh Kumar Mule Jan 19, 2023 3:50 PM

Pune Municipal Corporation | MLA Bhimrao Tapkir | आमदार भीमराव तापकीर यांना पुणे मनपाच्या विरोधात का करावे लागत आहे आंदोलन?
Helmet Day In Pune | २४ मे ला पुण्यात ‘लाक्षणिक हेल्मेट दिवस’
Old Pension Schemes | चांगली बातमी!  जुनी पेन्शन योजना लागू होणार?  | केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार OPS चा लाभ?  

आंबेगाव कचरा प्रकल्प | प्रदूषण मंडळाकडे १२ लाख ३० हजार येत्या २ महिन्यात जमा करावे लागणार

महापालिकेने (PMC Pune) आंबेगाव खूर्द येथे उभारलेल्या 200 टन कचरा प्रकल्पास (Garbage Project) आग लावण्यात आल्याच्या घटनेनंतर या प्रकल्पाविरोधात राष्ट्रीय हरित लवादात (national green tribunal) याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या अंतिम सुनावणीत एनजीटीने (NGT) या ठिकाणी सुक्‍या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या प्रकल्पास मान्यता दिली आहे. मात्र प्रकल्प सुरु करण्या अगोदर या परिसरात महापालिकेला १२ लाख ३० हजार रुपयाची पर्यावरण पूरक कामे करावी लागणार आहेत. त्यासाठी महापालिकेला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे हे पैसे आधी जमा करावे लागणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे.

महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमुळे वाढणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेकडून आंबेगाव बु. मध्ये स. नं 51/10 येथे 2018-19 मध्ये 200 टन क्षमतेचा कचरा प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पाची ट्रायल रन 20 सप्टेंबर 2020 ते 31 ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आली. त्यावेळी प्रकल्पास आग लावण्यात आली होती. याबाबत पालिकेने पोलिसात तक्रार दिली होती. तेव्हा हा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी एनजीटी मध्ये याचिका दाखल करण्यात आली. मात्र, महापालिकेने नव्या गावांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हा प्रकल्प आवश्‍यक असल्याची भूमिका घेतली. त्यामुळे एनजीटीने या ठिकाणी सुक्‍या कचऱ्यावर प्रक्रिया करणाच्या प्रकल्पास मान्यता दिलेली आहे. या ठिकाणी 150 टन सुक्‍या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. (pune municipal corporation)