Amazing Posters in Pune | राज्य सरकारच्या कारभारावर टीका करणारे पोस्टर्स | पुण्यातील पोस्टर्स ने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण 

HomeBreaking News

Amazing Posters in Pune | राज्य सरकारच्या कारभारावर टीका करणारे पोस्टर्स | पुण्यातील पोस्टर्स ने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण 

Ganesh Kumar Mule Sep 11, 2024 4:12 PM

Mohan Joshi : भाजपने घेतलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निर्णयांची छाननी करावी!
Sambhaji Patil Nilangekar : आमदार संभाजी पाटील निलंगेकर म्हणतात, महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्त्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त!
BJP Manifesto 2024 | भाजपचे संकल्पपत्र ‘विकसित भारता’चा रोड मॅप | माधव भांडारी

Amazing Posters in Pune | राज्य सरकारच्या कारभारावर टीका करणारे पोस्टर्स | पुण्यातील पोस्टर्स ने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

 

Pune Politics – (The Karbhari News Service)  – महायुती सरकारवर खास करून भाजपवर टीका-टिपण्णी करणारे पोस्टर्स पुणे शहरात विविध ठिकाणी पाहायला मिळाल्याने या पोस्टरची शहराच्या राजकीय वर्तुळात  दिवसभर चर्चा रंगली होती. (Pune News)

राज्य व केंद्रातील सरकारवर निशाणा साधणारे पोस्टर्स संपूर्ण शहरात लावल्याचे दिसून आल्याने नागरिक आवर्जून थांबत या पोस्टरकडे पाहत होते. या पोस्टरवर जीएसटीपासून महागाईपर्यंत अनेक मुद्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. कुठे खर्चावर चर्चा, तर कुठे काही नेत्यांचा पाकीटमार  उल्लेख करीत हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. यामध्ये सामान्यांना लागणाऱ्या वस्तूंवर अधिक तर जीएसटी श्रीमंतांच्या वापरातील वस्तूंवर तुलनेने कमी जीएसटी आकारला जात असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर वाढत्या महागाईवरूनदेखील सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले आहे.  खिशात शिल्लक उरेना आता करू खर्चावर चर्चा,  अशा प्रकारचे मुख्य चौकांमध्ये हे पोस्टर्स लावण्यात आले असून, दिवसभर चर्चेचा विषय ठरले आहेत.

दरम्यान, हे पोस्टर्स कोणी लावले, याबाबत तर्कवितर्क वाढविले जात आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0