Archana Patil : महिलांच्या सक्षमीकरणासाठी सदैव तत्पर : नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांचे प्रतिपादन

HomeपुणेPolitical

Archana Patil : महिलांच्या सक्षमीकरणासाठी सदैव तत्पर : नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांचे प्रतिपादन

Ganesh Kumar Mule Oct 28, 2021 6:14 AM

BJP Mahila Aghadi : सामान्यांची आरोग्यसेवा स्तुत्य उपक्रम : आमदार सुनील कांबळे यांचे प्रतिपादन
PMC : परराज्यातील पदवी असलेल्या अभियंत्यांचे अधिकार गोठवणार!  : स्थायी समितीची मंजूरी
Archana Tushar Patil : कै. श्रीमती पार्वतीबाई दत्तात्रय पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलचे उद्द्घाटन : नगरसेविका अर्चना पाटील यांच्या प्रयत्नांना यश

महिलांच्या सक्षमीकरणासाठी सदैव तत्पर

भाजप महिला आघाडी अध्यक्षा, नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांचे प्रतिपादन

सौ भाग्यवंती 2021 लकी ड्रॉ स्पर्धेला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद

पुणे : तुम्ही आज एवढ्या संख्येने सहभागी झालात. आज महिलांची मत ऐकताना माझे मन भारावून आले. अशाच तुमचे प्रेम माझ्यावर कायम राहू दया. माझ्या प्रभागातील प्रत्येक महिला सक्षम झाली पाहिजे आणि त्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील असे मत नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांनी व्यक्त केले.

भाजप महिला आघाडी अध्यक्षा, नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 19 मध्ये सौ भाग्यवंती 2021 लकी ड्रॉ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार सुनील कांबळे, मा. आमदार दिलीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष तुषार पाटील यांनी केले होते. याला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

2021 च्या सौ भाग्यवंती होण्याचा मान अशोकनगर मधील पुनम गायकवाड यांना मिळाला. त्यांना लकी ड्रॉ मध्ये ॲक्टिवा मिळाली. या ॲक्टिवा ची चावी नगरसेविका अर्चना पाटील यांच्या मातोश्री रजनी जाधव आणि तुषार पाटील यांच्या मातोश्री तृप्तीदेवी पाटील यांच्या हस्ते पुनम गायकवाड यांना देण्यात आली. द्वितीय क्रमांक साधना जाधव यांना फ्रीज बक्षीस देण्यात आले. तृतीय क्रमांक स्नेहल काळे यांना टीव्ही मिळाला.

यावेळी आमदार सुनील कांबळे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून नगरसेविका अर्चना पाटील यांना शुभेच्छा दिल्या. बक्षीस वितरण आमदार सुनील कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

आज मी जो उभा आहे ते माझ्या प्रभागातील नागरिकांमुळे : तुषार पाटील

यावेळी तुषार पाटील म्हणाले, आज मी जो उभा आहे ते माझ्या प्रभागातील नागरिकांमुळे, आणि माझ्या मित्ररुपी कार्यकर्त्यांमुळे. प्रभागातील प्रत्येक नागरिक हा माझ्या कुटुंबाचाच भाग आहेत. माझ्या प्रभागातील कष्टकरी वर्गातील तरुण- तरुणी फॉरेनला जेव्हा शिक्षण घेतील तेव्हा माझ्या कामाची पावती मला मिळेल. आज पर्यंत जस काम केले त्यापेक्षा जास्त काम करायचं आहे. असेच तुमचे प्रेमरुपी आशीर्वाद कायम असूद्या…

यावेळी अशोक तरुण मंडळ आणि अण्णा भाऊ साठे तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाटील यांनी केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: