वेतन लवकर करण्यासाठी प्रशासनाची लगबग
: बिल लेखनिकांना शनिवार, रविवारी काम करण्याचे आदेश
: असे आहेत आदेश
पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील कार्यरत अधिकारी/कर्मचारी व सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांना नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी ७ वा वेतन आयोग लागू करणेबाबत दि.१६/०९/२०२१ रोजी आदेश प्रसुत केले आहेत. त्याप्रमाणे माहिती व तंत्रज्ञान विभाग यांचेमार्फत वेतन बिल लेखनिक व ऑडीटर यांना प्रशिक्षण देऊन बिल तपासणीचे कामकाज सुरु करण्यात आलेले आहे. ७ वा वेतन आयोगाप्रमाणे सर्व अधिकारी/कर्मचारी यांना माहे नोव्हेंबर २०२१ पेड इन डिसेंबर महिन्याचे वेतन अदा करणेस मा. महापालिका आयुक्त यांनी आदेश दिलेले आहेत. त्यामुळे ७ वा वेतन आयोगाची बिले तातडीने तपासणी करणे आवश्यक आहे. जेणेकरून सर्व मनपा कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर २०२१ वेतन अदा करता येईल. सबब, पगार बिल ऑडीट विभागाकडील सर्व सेवकांनी शनिवार दि.११/१२/२०२१ व रविवार दि.१२/१२/२०२१ रोजी कामावर उपस्थित राहून ७ वा वेतन आयोगाच्या बिलांची तपासणी करण्यात यावी. तसेच मनपा भवनातील सर्व कार्यालय व १५ क्षेत्रीय कार्यालामधील बिल लेखनिक यांनी उपरोक्त दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहून ७ वा वेतन आयोगाच्या बिलांची तपासणी करून घेण्याची दक्षता संबधित बिल लेखनिक यांनी घ्यावी.
COMMENTS