Ward Offices and All Depts : Additional Commissioners : महापालिकेच्या तीनही अतिरिक्त आयुक्तांनी एकत्रितपणे सर्व विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांना ‘या’ कारणामुळे फटकारले

HomeBreaking Newsपुणे

Ward Offices and All Depts : Additional Commissioners : महापालिकेच्या तीनही अतिरिक्त आयुक्तांनी एकत्रितपणे सर्व विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांना ‘या’ कारणामुळे फटकारले

Ganesh Kumar Mule Apr 13, 2022 3:51 PM

Progress Report | PMC Pune | 25 कोटींच्या वरील कामाचा दर 15 दिवसांनी आयुक्तांना अहवाल द्यावा लागणार
DCM Ajit Pawar : प्रशासकीय मान्यता असेल तरच विकास कामाचे उदघाटन करणार  : उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या कामाबाबत चोख 
Emergency works | प्रत्येक प्रभागात तातडीच्या कामांसाठी 1 कोटी | वित्तीय समितीत महापालिका आयुक्तांची मान्यता

विकास कामांच्या नोंदी GIS प्रणालीमध्ये होत नाहीत

: तिन्ही अतिरिक्त आयुक्तांनी महापालिकेचे सर्व विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांना फटकारले

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या विकास कामांच्या अद्ययावत माहितीच्या नोंदी करणेकरिता टेंडर युटीलिटी इंटरप्राईज जी.आय.एस प्रणालीच्या माध्यमातून विकसित करणेत आलेली आहे. जेणेकरून पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांकडील विकास कामांमध्ये प्रशासकीय निर्णय घेताना गती येणार असून त्याबाबतची भौगोलिक माहिती पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना त्वरित प्राप्त होणार असल्याने प्रशासकीय निर्णय घेण्यास मदत होणार आहे. विकास कामांच्या नोंदी GIS प्रणालीमध्ये होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे महापालिकेच्या तीनही अतिरिक्त आयुक्तांनी सर्व विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांना फटकारले आहे. आणि जुन्या व यापुढे करण्यात येणाऱ्या कामांच्या नोंदी GIS प्रणालीच्या बेस मॅपवर करण्यात याव्यात. असे आदेश दिले आहेत.
: असे आहेत आदेश

पुणे महानगरपालिकेच्या विकास कामांच्या अद्ययावत माहितीच्या नोंदी करणेकरिता टेंडर युटीलिटी इंटरप्राईज जी.आय.एस प्रणालीच्या माध्यमातून विकसित करणेत आलेली आहे. जेणेकरून पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांकडील विकास कामांमध्ये प्रशासकीय निर्णय घेताना गती येणार असून त्याबाबतची भौगोलिक माहिती पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना त्वरित प्राप्त होणार असल्याने प्रशासकीय निर्णय घेण्यास मदत होणार आहे.
तदनुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या विकास कामांच्या अद्ययावत माहितीच्या नोंदी सर्व संबंधित विभागांनी/खाते/क्षेत्रिय कार्यालय यांनी GIS प्रणालीच्या Base Map Layers वर करून घ्यावयाच्या असून सर्व संबंधित विभागप्रमुख/खातेप्रमुखांनी याची काटेकोर अंमलबजावणी करणेबाबत मा. महापालिका आयुक्त यांचेमार्फत संदर्भाकित अन्वये आदेश देण्यात आले होते. तथापि विकास कामांच्या नोंदी GIS प्रणालीमध्ये होत नसल्याचे निदर्शनास येत आहे.

तरी माहिती व तंत्रज्ञान पुणे महानगरपालिका जा.क्र. ९१० दिनाक १४/०१/२०२१ च्या कार्यालयीन परिपत्रकानुसार पुणे महानगरपालिका अंदाजपत्रकीय सन २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२०, २०२०-२१
व २०२१-२२ या आर्थिक वर्षातील “स” यादीसह पूर्ण झालेली कामांची नोंद सर्व संबंधित विभागांनी/खाते/क्षेत्रिय कार्यालय यांनी GIS प्रणालीच्या Base Map Layers वर करून ,सदर GIS नोंदी पूर्ण झाल्या बाबतचा अहवालाची पडताळणी मा माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत करून,GIS नोंदीबाबत
संपूर्ण अहवाल सादर करण्यात यावेत . तसेच यापुढेही करण्यात येणाऱ्या कामांच्या नोंदी GIS प्रणालीच्या बेस मॅपवर करण्यात याव्यात.तरी सर्व संबंधित विभाग/खाते/क्षेत्रिय कार्यालय यांनी याबाबत काटेकोर
अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0