Khadakwasla Dam Chain | खडकवासला धरण साखळीतील चारही धरणे १००% भरली  |चारही धरणातून एकाच वेळी विसर्ग

HomeBreaking Newsपुणे

Khadakwasla Dam Chain | खडकवासला धरण साखळीतील चारही धरणे १००% भरली |चारही धरणातून एकाच वेळी विसर्ग

Ganesh Kumar Mule Aug 20, 2022 2:09 AM

Discharge water from Khadakwasla Dam | खडकवासला धरणातून २५६८ क्युसेक पाण्याचा विसर्ग 
Rain Water | Dams | चार धरणातील पाणी साठ पोहोचला ३.६७ टीएमसी वर  | धरण क्षेत्रात जोरदार पाऊस 
Pune Rain | पुणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली | पाणीपुरवठा करणारी धरणे ९७% भरली 

खडकवासला धरण साखळीतील चारही धरणे १००% भरली

|चारही धरणातून एकाच वेळी विसर्ग

पुणे शहरासह जिल्ह्याला पिण्यास व शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या चारही धरणात मिळून २९.१५ टीएमसी म्हणजे १०० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. ही धरणे १०० टक्के भरल्यामुळे त्या चारही धरणातून विसर्ग सुरू आहे.

धरण साखळीतील पाणीसाठ्याच्या दृष्टीने सर्वात मोठे धरण म्हणून वरसगाव धरण आहे. वेल्हे व मुळशी या दोन लगतच्या तालुक्यात याचे पाणलोट क्षेत्र आहे. मोसे नदीवरील या धरणाची उपयुक्त साठवण क्षमता १२.८२ टीएमसी आहे. हे धरण यंदा १३ ऑगस्ट रोजी १०० टक्के भरले. या धरणातून पाच हजार ७१० क्यूसेकने विसर्ग सुरु आहे.

धरण साखळीतील पाणीसाठ्याच्या दृष्टीने दुसरे मोठे धरण म्हणून पानशेत धरण आहे. या धरणाची उपयुक्त साठवण क्षमता १०.६५ टीएमसी आहे. हे धरण यंदा १० ऑगस्ट रोजी १०० टक्के भरले. या धरणातून सध्या तीन हजार ९०८ क्यूसेकने विसर्ग सुरु आहे.

टेमघर धरणाची उपयुक्त साठवण क्षमता ३.७१ टीएमसी आहे. यंदा हे धरण १९ ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजता १०० टक्के भरले. या धरणातून ३५० क्युसेकचा विसर्ग सुरु आहे. वरसगाव, पानशेत व टेमघर या तिन्ही धरणातून सोडलेले पाणी खडकवासला धरणात जमा होते. या तिन्ही धरणातून मिळून खडकवासला धरणात पाणी जमा होत आहे. खडकवासला धरणातून सायंकाळी १० हजार २४६ क्युसेकने पाणी सोडले जात आहे. अशा प्रकारे या धरणातून आत्तापर्यंत ११ टीएमसी पाणी नदीत सोडले आहे.