Schools, College Remain Closed : पुण्यात सर्व शाळा-महाविद्यालये बंदच राहणार !

HomeपुणेBreaking News

Schools, College Remain Closed : पुण्यात सर्व शाळा-महाविद्यालये बंदच राहणार !

Ganesh Kumar Mule Jan 22, 2022 7:40 AM

ST workers : Ajit pawar : आम्ही एसटी कर्मचाऱ्यांना सांगायचो… अजित पवार म्हणाले…
Ajit Pawar Budget 2025 | महाराष्ट्र आता थांबणार नाही.., विकास आता लांबणार नाही…’ | अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्धार
CM Eknath Shinde | ‘अब की बार, महाराष्ट्रात ४५ पार’ | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुण्यात सर्व शाळा-महाविद्यालये बंदच राहणार !

पालकमंत्री यांच्या बैठकीत निर्णय

पुणे : कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंदच ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या पालकमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत घेण्यात आला. पुढील बैठकीत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

पुण्यातील शाळा बंदच राहणार असल्याची महत्वाची माहिती समोर येत आहे. राज्यातील सर्व शाळा सोमवारपासून सुरू होत असून फक्त पुण्यातील शाळांसाठी स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यामध्ये शाळांबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात अद्याप शाळा सुरू करण्यास महापौरांनी नकार दिला. त्यानंतर पालकमंत्री अजित पवारांनी बैठक बोलावली. यामध्ये महत्वाची घोषणा झाली आहे. (Ajit pawar holds review meeting on schools reopen in pune)

 सध्या राज्यातील सर्व शाळा सोमवारपासून सुरू होणार आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात घोषणा केली. परंतू, शाळांचा निर्णय स्थानिक पातळीवरील प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे. त्यानुसार पुण्याच्या महापौरांनी शाळा सुरू करण्यास नकार दर्शवला होता. यानंतर आज पालकमंत्री अजित पवारांच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. मागील चोवीस तासात पुण्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडल्याने सध्या शाळा फक्त ऑनलाईन पद्धतीने सुरू ठेवण्याची घोषणा झाली आहे. रुग्णसंख्या कमी होत नाही, तोपर्यंत ही नियमावली कायम राहणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. तसेच पुढील बैठकीत यासंदर्भात माहिती देणार असल्याचं ते म्हणाले.

जलतरण तलाव सुरु राहणार !

पुणे शहरातील जलतरण तलाव सुरु करण्याचा निर्णय पालकमंत्री कोरोना संसर्ग आढावा बैठकीत घेण्यात आला असून दोन डोस घेतलेले नागरिक आणि स्पर्धांसाठी तयारी करणारे खेळाडू यांनाच जलतरण तलावात प्रवेश असणार आहे. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. महापौर पुढे म्हणाले, पुणे मनपा हद्दीतील उद्याने सकाळच्या सत्रात सुरू करण्याचा निर्णय आज झालेल्या पालकमंत्री कोरोना संसर्ग आढावा बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबतचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल.

0 Comments