culvert construction | कल्व्हर्ट बांधकाम / दुरुस्तीच्या कामांचा अतिरिक्त आयुक्तांनी मागवला अहवाल  | 7 जुलै पूर्वी अहवाल सादर करण्याचे निर्देश 

HomeBreaking Newsपुणे

culvert construction | कल्व्हर्ट बांधकाम / दुरुस्तीच्या कामांचा अतिरिक्त आयुक्तांनी मागवला अहवाल  | 7 जुलै पूर्वी अहवाल सादर करण्याचे निर्देश 

Ganesh Kumar Mule Jun 26, 2022 9:07 AM

Multipurpose workers | महापालिकेच्या विविध खात्यात घेतले जाणार बहुउद्देशीय कामगार  | 5 जुलै पर्यंत आवश्यक कामगारांची माहिती देण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश 
  Prithviraj B P IAS accepted charge of the post of Additional Pune Municipal Commissioner 
Unauthorized hoardings : PMC : विद्युत पोलसहित शहरात ठिकठिकाणी अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट! : प्रशासनाची कारवाई थंडावल्याने कामकाजावर प्रश्नचिन्ह

कल्व्हर्ट बांधकाम / दुरुस्तीच्या कामांचा अतिरिक्त आयुक्तांनी मागवला अहवाल

| 7 जुलै पूर्वी अहवाल सादर करण्याचे निर्देश

पुणे | पावसाळ्याच्या दिवसात कल्वर्ट दुरुस्त न केल्याने किंवा त्याचे बांधकाम व्यवस्थित न झाल्याने अपघातक्षम परिस्थिती निर्माण होते. हे टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने गंभीरपणे पाऊल उचलले आहे. तसेच या बाबतच्या कामाचा अहवाल 7 जुलै पूर्वी सादर करण्याचे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार यांनी दिले आहेत.

असे आहेत आदेश

पुणे मनपा हद्दीमध्ये विविध ठिकाणी विविध पॅकेजेस अंतर्गत कल्व्हर्टचे नवीन बांधकाम / दुरुस्तीची आदेश पथ विभागा अंतर्गत करण्यात येत आहेत. चालू पावसाळ्याचा विचार करता कार्यवाहीत असलेली नवीन बांधकामे व दुरुस्तीची कामे त्वरेने पूर्ण होणे आवश्यक आहे. तसेच सदर कामामुळे नाला / ओढा यांच्या प्रवाहात अडथळा होईल अशा प्रकारे कामाचा राडारोडा
अथवा अन्य साहित्य राहणार नाही याची खात्याकडून दक्षता घेणे आवश्यक आहे. सुरु असलेल्या बांधकाम / दुरुस्तीच्या कामामुळे कोणत्याही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होणार नाही यासाठी काटेकोर उपाययोजना करण्यात यावी. अपघातक्षम परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक तेथे वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था व सुरक्षा कठड्यांची व्यवस्था करावी. आपल्या विभागा अंतर्गत सुरु असलेल्या कल्व्हर्ट बांधकाम / दुरुस्तीच्या कामांची अद्ययावत मद्यस्थिती बाबतचा (पॅकेज निहाय) अहवाल आमचेकडे दिनांक ०७/०७/२०२२ पूर्वी सादर करावा. असे आदेशात म्हटले आहे.