एक्स्प्रेस हायवे वरील अनधिकृत फर्निचर शोरूम आणि हॉटेल्स वर कारवाई
| महापालिका कर संकलन विभागाची वसुली मोहीम
पुणे | महानगरपालिकेने प्रथमच वसुली मोहिमे स्वरूपात पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे शेजारील अनाधिकृत आलिशान फर्निचर चे शोरूम व अनधिकृत हॉटेल्स यांच्यावर कारवाई केली. एकाच दिवसात एकूण 24 थकबाकीदारांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये चार कोटी नव्वद लाख रुपये थकीत होती. कारवाईत अंतिम एक कोटी 34 लाखाची वसुली झाली आहे. मिळकती चालू स्थितीत असल्याने सील करण्यासाठी कर विभागाच्या सेवकांना जीकेरीचे प्रयत्न करावे लागले.
या पुढेही अशा प्रकार मोहिम स्वरूपात व्यापारी गाळे, अनधिकृत मिळकती तसेच निवासी मिळकती वर कारवाई होणार असून थकीत कर लवकरात लवकर भरावे असे आवाहन अजित देशमुख उपायुक्त, कर आकारणी व कर संकलन प्रमुख यांनी केले आहे. या कारवाईत प्रशासन अधिकारी रवींद्र धावरे, सुनील मते, वसंत सुतार, राजेश कामठे यांचे नियंत्रणाखाली विभागीय निरीक्षक दीपक आवटे, श्री कमलेश प्रधान, नितीन बोऱ्हाडे हनुमंत अडगळे गणेश मांजरे प्रशांत घाडगे सागर शिंदे राजेंद्र पेंडसे गणेश लाड विकास खिलारे भानुदास यादव आशिष बतीसे मंगेश चांदेरे रोहन मकवाना, अवधूत देशपांडे,नवनाथ पाडळे, अतुल दगडे, सतीष दगडे, अजय वाघमारे, किरण दगडे, मंगेश चांदेर, संग्राम देवकर, मीरा पाटील, विकास चांदेरे व औंध बाणेर बालेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील सर्व पेठ निरीक्षक यांनी कामकाज पाहिले.