Aba Bagul in Shivsena | आबा बागुल आणि त्यांचा कुटुंबाचा शिवसेनेत प्रवेश | भाजप मध्ये जाण्याची चर्चा असताना शिवसेनेचा झेंडा हाती
Pune Shivsena – (The Karbhari News Service) – कॉंग्रेस कडून उपमहापौर राहिलेले आणि माजी नगरसेवक आबा बागुल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. बागुल यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबीयांनी देखील सेनेत प्रवेश केला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून बागुल हे भाजप मध्ये जाणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र बागुल यांनी अचानक शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (PMC Election 2025-26)
आबा बागुल सलग सहा वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. कॉंग्रेस कडून त्यांनी उपमहापौर, पक्षनेता अशी विविध पदे सांभाळली. मात्र गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस कडून पर्वती विधानसभे साठी तिकीट नाकारले होते. यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना हार स्वीकारावी लागली होती. तेव्हापासूनच बागुल हे भाजप मध्ये जातील, अशी चर्चा होती. त्यांनी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटी देखील घेतल्या होत्या. मात्र अचानक त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी आणि त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुले यांनी देखील सेनेत प्रवेश केला. चर्चा अशी आहे कि नगरसेवक पदासाठी त्यांच्या घरी दोन तिकिटे हवी आहेत. नवीन पक्षात त्यांना काय आश्वासन दिले गेले आहे हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे.

COMMENTS