महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ‘कमळाबाई’ ची आरती
: खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती
पुण्यातील शनिपार चौक येथे वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हनुमानाची आरती करून महागाई कमी करण्याचे साकडे घालत अभिनव आंदोलन करण्यात आले. खासदारसुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या आंदोलनात महागाई ची देवी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ‘ कमळाबाई ‘ ची आरती करण्यात आली.
वेळी बोलताना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले की, ” मला आजही आठ वर्षांपूर्वी स्वर्गीय सुषमाजी स्वराज यांचे एक वाक्य आठवते ” आकडों से पेट नही भरता साहब धान से भरता है” आज केंद्रातील भाजप सरकारने किमान स्व.सुषमा स्वराज यांच्या या वक्तव्याची जाण ठेवत देशातील महागाई कमी करावी नागरिकांना दिलासा द्यावा. गेल्या दोन दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलेंडरमध्ये तब्बल पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली. एकाच दिवशी गॅस सिलिंडरच्या किमतीत पाच टक्क्यांनी झालेली ही वाढ खरोखर अन्यायकारक अशीच आहे .आज जीवनावश्यक वस्तू असणाऱ्या प्रत्येक वस्तूचे दर वाढलेले आहेत पेट्रोल, डिझेल, सी.एन.जी, पी.एन.जी,घरगुती गॅस,व्यवसायिक गॅस, खाद्यतेल अश्या सर्वच वस्तूंच्या किमतींमध्ये वाढ होण्यास मोदी सरकारची धोरणे कारणीभूत आहेत”.
शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, देशातील सर्व प्रश्न सुटले असून, हनुमानाची आरती केल्याने उर्वरित प्रश्न देखील सुटणार आहेत असा संदेश गेल्या काही दिवसांत भाजप,मनसे,नरेंद्र मोदी , राज ठाकरे देत असून त्या अनुषंगाने सर्वसामान्य पुणेकरांना हनुमान प्रसन्न व्हावे व महागाई कमी व्हावी यासाठी आज शनिपार येथे हनुमानास साकडे घालण्यात आल्याने आता येत्या काळात सिलेंडर १ हजार रुपयांवरून ३०० रुपये , पेट्रोल १२५ रुपयांवरून ५० रुपये व्हावा अशी आम्हाला अपेक्षा आहे.
जनतेचा विचार न करता केवळ आपले निर्णय त्यांच्यावर लादणारे सरकार म्हणून मोदी सरकारचा नावलौकिक आहे. वेग -वेगळे कायदे असतील, नोटबंदी जी.एस.टी लागू करणे, सरकारी कंपन्या – बँका विकणे, जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवणे असे अनेक निर्णय मोदी सरकारने या देशाला दिले आणि या निर्णयामुळे हा देश होरपळत आहे.
या आंदोलनासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ज्येष्ठ नेते अंकुशआण्णा काकडे,स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे,निलेश निकम,नगरसेवक प्रदीप गायकवाड, प्रवक्ते प्रदीप देशमुख,महिला अध्यक्षा मृणालिनी वाणी, युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे, कार्यासौ.रुपाली ठोंबरे पाटील आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS