Aam Aadmi Party | दिल्लीतील आप चे नगरसेवक आणि आमदार आज पुणे मनपा दौऱ्यावर  | विविध प्रकल्पांची करणार पाहणी

HomeBreaking Newsपुणे

Aam Aadmi Party | दिल्लीतील आप चे नगरसेवक आणि आमदार आज पुणे मनपा दौऱ्यावर | विविध प्रकल्पांची करणार पाहणी

Ganesh Kumar Mule Dec 21, 2022 3:40 AM

AAP | रयतच्या पदाधिकाऱ्यांनी आम आदमी पार्टी मध्ये केला जाहिर प्रवेश
AAP | गुणवत्ता आणि संधी नाकारणारा कंत्राटी भरती आदेश मागे घ्या : आप
AAP | Kasba By election | आम आदमी पार्टीचे किरण कद्रे कसबा विधानसभा मतदार संघातून लढणार

दिल्लीतील आप चे नगरसेवक आणि आमदार आज पुणे मनपा दौऱ्यावर

| विविध प्रकल्पांची करणार पाहणी

दिल्ली विधानसभा आणि महापालिकेवर (Delhi Legislative Assembly and Municipal Corporation) एकहाती सत्ता असणाऱ्या आम आदमी पक्षाचे (AAP) आमदार, नगरसेवक पुण्यातील कचरा व्यवस्थापन, बायोगॅस प्रकल्प आणि उत्पन्न वाढीसाठी मिळकतकर याचा अभ्यास करणार आहेत. यासाठी १४ जणांचे शिष्टमंडळ बुधवारी (ता.२१) आणि गुरुवारी (ता. २२) शहरातील विविध ठिकाणी भेटी देणार आहे. (Pune Municipal corporation)

पुणे शहरातील कचरा फुरसुंगी व उरुळी देवाची येथील कचरा डेपोवर उघड्यावर टाकणे बंद केले, त्यानंतर कचरा जिरविण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना केल्या. त्यामध्ये कचरा डेपो येतील लाखो टन कचऱ्याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने कॅपींग करणे, तो परिसर दुर्गंधीमुक्त करणे, वृक्षारोपण करणे अशी कामे केली.(PMC Pune)

ओला कचरा जिरविण्यासाठी बायोगॅस प्रकल्प सुरू केले. सध्या शहरातील१३ प्रकल्प सुरू आहेत. त्याच प्रमाणे स्वच्छ संस्थेमार्फत घरोघरी जाऊन कचरा संकलनाचे मॉडल अशा विविध उपाययोजना केल्या आहेत. दिल्ली विधानसभेत आपची सत्ता आहे. पण महापालिकेत भाजपची सत्ता होती. काही दिवसांपूर्वी महापालिका निवडणूका झाल्या, त्यामध्ये आपने महापालिकेवरही सत्ता मिळवली आहे. दिल्ली महापालिकेत दिल्लीतील सर्व ७ खासदार, १४ आमदार आणि सर्व नगरसेवक यांच्या विविध समित्या स्थापन केल्या जातात. त्यापैकी एक समिती पुणे शहराच्या दौऱ्यावर येत आहे. त्यामध्ये आमदार, नगरसेवक आणि अधिकारी असे १४ जणांचे शिष्टमंडळ आहे. महापालिकेत त्यांची आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह बैठक होणार आहे. त्यानंतर पुढील दोन दिवसात विविध प्रकल्पांची पाहणी करणार आहेत.(Aam aadmi party)