Pune Fire | नगर रस्ता,वडगाव शेरी येथील भंगार मालाच्या गोडाउनला भीषण आग

HomeBreaking Newsपुणे

Pune Fire | नगर रस्ता,वडगाव शेरी येथील भंगार मालाच्या गोडाउनला भीषण आग

Ganesh Kumar Mule Nov 03, 2022 1:40 PM

SKADA system | पथ विभाग निविदा वाद | स्काडा यंत्रणेशिवाय काम केल्याचा आरोप | अधिकारी, ठेकेदार, कन्सल्टंट यांच्यावर कारवाई करण्याची अरविंद शिंदे यांची मागणी
PMC Pune Recruitment Exam Dates | महापालिका भरती परीक्षा | कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक पदाच्या परीक्षेच्या संभाव्य तारखा जाणून घ्या!
Mohan Joshi | कसब्यातील काँग्रेसच्या विजयामुळेच झुकला भाजप | मोहन जोशी

नगर रस्ता,वडगाव शेरी येथील भंगार मालाच्या गोडाउनला भीषण आग

पुणे – आज दुपारी  नगर रस्ता, वडगाव शेरी, सोपान नगर येथे एका भंगारच्या गोडाऊनला आग लागली असल्याची वर्दि दलाच्या नियंञण कक्षात मिळताच व नागरिकांचे सतत फोन येत असल्याने प्रथम येरवडा व धानोरी अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन वाहन व एक टँकर रवाना करण्यात आला. त्याचवेळी वर्दिवर पोहोचताना अधिकारी सुभाष जाधव यांनी दुरूनच मोठा धूर पाहत अतिरिक्त फायरगाडी व टँकरची मागणी करताच नायडू, हडपसर तसेच पीएमआरडीए आणि दलाचे व महापालिकेचे वॉटर टँकर अशी एकुण सुमारे १५ वाहने व ०८ अग्निशमन अधिकारी व जवळपास ५० ते ६० जवान दाखल होते.

घटनास्थळी पोहोचताच आग भीषण स्वरुपात असल्याचे निदर्शनास येताच दलाच्या जवानांनी होज पाईप वापरत पाण्याचा मारा सुरू केला. त्याचवेळी अग्निशमन अधिकारी यांनी आगीमधे कोणी आत अडकले आहे अथवा कसे याची चौकशी करत खाञी केली असता कोणी नसल्याचे समजले. त्या ठिकाणी सुमारे ६,००० स्केवर फुट व शेजारीच ४,००० स्केवर फुट जागेत पञ्याच्या शेडमधे उभारलेले हे भंगार मालाचे गोडाउन असल्याने जवानांनी घन, पोगर, कटर व इतर अग्निशमन उपकरणांचा वापर करीत पञा काढत आतमधे प्रवेश करुन आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. सुमारे तासाभरा नंतर दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणत शेजारी जवळच असलेली पञ्याची शेडची काही घरे व दुकाने यांना आगीच्या ज्वाळांपासून वाचविले व मोठा धोका टाळला. या गोडाऊधमनमधे छोटे व मोठे असे एकुण ०८ ते १० सिलेंडर ही फुटले. घटनास्थळी जेसीबी यांची मदत घेत जळालेला माल आजुबाजूला करीत पाणी मारत आग पुर्ण विझवली. शेजारील पाण्याच्या हौदातून पंपाच्या साह्याने पाण्याचा उपसा केला. सदर ठिकाणी कोणीही जखमी नसून जिवितहानी नाही याची खाञी केली.

या कामगिरीत दलाचे वरिष्ठ अधिकारी रमेश गांगड, गजानन पाथ्रुडकर, विजय भिलारे, सुभाष जाधव व पीएमआरडीएचे विजय महाजन व इतर जवानांनी सहभाग घेतला.

—-

“भंगार साहित्या मध्ये बरेचसे सिलेंडर होते ज्यांच्या स्फ़ोट होता त्या मुळे अतिशय धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती अशा वेळेस अग्निशमन दलाने अतिशय कौशल्यपूर्ण परिस्थिती हाताळून आगीवर नियंत्रण मिळवले “

| देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी