OPen chamber: चेंबर मध्ये पडलेला इसम सुखरूप बाहेर

Homeपुणे

OPen chamber: चेंबर मध्ये पडलेला इसम सुखरूप बाहेर

Ganesh Kumar Mule Oct 02, 2021 7:10 AM

Pariksha pe Charcha | क्रांतीवीर लहुजी वस्ताद शाळेत ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम संपन्न
Commission for Scheduled Castes rebuked the Pune Municipal Commissioner again!
Pune News |Pune University |पुणे विद्यापीठात नृत्य संकुल उभारणार!

  चेंबर मध्ये पडलेला इसम सुखरूप बाहेर

: अग्निशमन दलाच्या जवानांची कामगिरी

पुणे: आज सकाळी नऊ वाजता काञज चौकानजीक रस्त्यावर  झाकण नसलेल्या व पोलिसांनी त्याठिकाणी बॅरिकेड केलेल्या एका चेंबरमधे एक इसम पंधरा फुट खोल पडल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी सदर इसमास दोरीच्या साह्याने फासागाठ करुन सुखरुप बाहेर काढले. सिंहगड अग्निशमन केंद्रातील वाहनचालक संतोष चौरे, तांडेल पांडुरंग तांबे व जवान सतिश डाकवे, संजू चव्हाण, संदीप पवार यांनी कामगिरी पार पाडली.

 

: किती त्रास सहन करणार नागरिक

शहरात रस्त्यांवर अशाच प्रकारे बऱ्याच ठिकाणी चेंबर उघडे असलेले आढळून येतात. त्यावर झाकण नसते. चालताना किंवा गाडी चालवताना देखील नागरिकांना याचा त्रास होतो. त्यामुळे नागरिकांची खूप पंचाईत होते. पावसाळ्यात तर अशा घटना हमखास होतात. त्यामुळे प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळी अग्निशमन दल पोहोचू शकणार नाही.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0