राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने घेतली महानगरपालिकेच्या प्रशासकांची भेट
: पुणेकरांच्या समस्याबाबत राहणार सहकार्य : प्रशांत जगताप
पुणे : महानगरपालिकेवर प्रशासक म्हणून नियुक्त झालेले पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. महापालिकेला पुणेकरांच्या समस्या बाबत आमचे सहकार्य राहील. असे आश्वासन यावेळी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिले.
महापौर,सभागृह नेते,स्थायी समिती सभापती यांचा कार्यकाळ जरी संपला असला तरी ,पुणेकरांच्या समस्या मात्र संपल्या नाहीत. येत्या काळात निवडणुकांचा कालावधी जरी लांबला तरी विक्रम कुमार यांच्या माध्यमातून पुणेकरांच्या समस्या सुटतील. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रशासनास पूर्णपणे सहकार्य करेल अशी खात्री यानिमित्ताने या शिष्टमंडळाने दिली. असे जगताप यांनी सांगितले.
या शिष्टमंडळात शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, वैशाली बनकर, माजी उपमहापौर दिपक मानकर, दिलीप बराटे, मा.सभागृह नेते सुभाष जगताप, स्थायी समितीचे माजी चेअरमन विशाल तांबे , बाबुराव चांदेरे, अश्विनी कदम, बाळासाहेब बोडके, नगरसेवक सचिन दोडके, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीप धुमाळ, शहर समन्वयक महेश हांडे आदी उपस्थित होते.
COMMENTS