Water supply | PMC pune  | जलवाहिनीच्या कामामुळे शहराच्या काही भागात पाणीपुरवठा होणार विस्कळीत | जाणून घ्या  सविस्तर 

HomeBreaking Newsपुणे

Water supply | PMC pune | जलवाहिनीच्या कामामुळे शहराच्या काही भागात पाणीपुरवठा होणार विस्कळीत | जाणून घ्या  सविस्तर 

Ganesh Kumar Mule Oct 15, 2022 2:43 AM

Congress Pune | महागाई व GST च्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठीच काँगेस नेत्यांना मोदी सरकार त्रास देत आहे | अरविंद शिंदे
Dhol Tasha | MP Girish Bapat | Anurag Thakur | खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे केली ‘ही’ मागणी
Buying gold on Dhanteras |  धनत्रयोदशीला सोने खरेदी करताना या 3 गोष्टी लक्षात ठेवा | फसवणूक होणार नाही

जलवाहिनीच्या कामामुळे शहराच्या काही भागात पाणीपुरवठा होणार विस्कळीत | जाणून घ्या  सविस्तर

दांडेकर पूल येथे पर्वती जलकेंद्रातून लष्कर जलकेंद्राकडे जाणाऱ्या १६०० मिमी व्यासाच्या जलवाहिनी खराब झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू झाली आहे. ही गळती रोखण्यासाठी महापालिकेकडून रविवारी  जलवाहिनीतून होणारा पाणी पुरवठा बंद करून पर्यायी व्यवस्था उपलब्ध केली जाणार आहे. मात्र, यामुळे संपूर्ण हडपसर, लष्कर, कोंढवा भागातील पाणी पुरवठा विस्कळित होणार आहे. या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.

पर्वती जलकेंद्रातून लष्कर जलकेंद्रात १६०० मिमी व्यासाची जलवाहिनी जाते. ती खराब झाल्याने दुरुस्त केली जाणार आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून कॅनॉलमधून पाणी सोडले जाणार आहे. ते लष्कर जलकेंद्रात घेऊन शुद्धीकरण केले जाईल, त्यामुळे पर्यायी व्यवस्था उपलब्ध होणार आहे. जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम सुमारे १४ तास चालणार आहे, त्यामुळे रविवारी दिवसभर काम केले जाणार आहे, असे पाणी पुरवठा विभागाने सांगितले.

| या भागात कमी दाबाने येणार पाणी

बी.टी. कवडे रोड, भीमनगर, बालाजीनगर, विकासनगर, कोरेगाव पार्क, संपूर्ण हडपसर इंडस्ट्रिअल एरिया, मुंढवा, केशवनगर, माळवाडी, मगरपट्टा, सोलापूर रोड डावी बाजू, नंबर आकाशवाणी, हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळेनगर, काळेपडळ, ससाणेनगर, रामटेकडी इंडस्ट्रिअल एरिया, सय्यदनगर, हेवन पार्क, गोसावी वस्ती, शंकरमठ, वैदुवाडी, आनंदनगर, रामनगर, वानवडी, साळुंके विहार, आझादनगर, जगताप चौक परिसर, जांभूळकर मळा, सोलापूर रोड उत्तर बाजू. एस. व्ही.नगर, शांतिनगर, काळेपडळ, हांडेवाडी रोड, महंमदवाडी गाव, तरवडे वस्ती, कृष्णानगर, कोंढवा खुर्द, कोंढवा गावठाण, मिठानगर, भाग्योदयनगर, लुल्लानगर, संपूर्ण पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्द, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी बु, शेवाळवाडी, खराडी, वडगावशेरी पार्ट, संपूर्ण ताडीवाला रोड, मंगळवार पेठ, मालधक्का रोड, येरवडा गाव, एन. आय. बी. एम. रोड, रेसकोर्स.