पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी/सेवकांची दिवाळी गोड!
| बोनस बाबतचे परिपत्रक जारी
पुणे | महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी बोनस अर्थात सानुग्रह अनुदान आणि बक्षिसी दिली जाते.यंदा सन २०२१-२०२२ च्या मूळ वेतन + महागाई भत्ता यावर ८.३३% + १९,०००/- इतके सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. याबाबतचे परिपत्रक निघत नव्हते. ‘कारभारी’ वृत्तसंस्थेने या विषयाचा पाठपुरावा केला होता. त्यानुसार या प्रस्तावावर महापालिका आयुक्तांची शुक्रवारी दुपारी स्वाक्षरी झाली. त्यांनतर तात्काळ वित्त व लेखा विभागाने बोनस बाबतचे परिपत्रक जारी केले असून सर्व खात्यांना त्यानुसार सूचना केल्या आहेत. त्यानुसार लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल. दरम्यान गुरुवारी उचल रक्कम देखील देण्यात आली आहे.
| काय आहे परिपत्रकात?
पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी सेवक (रोजंदारी कामगारांसह) आणि माध्यमिक व तांत्रिक शिक्षण
विभागातील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांना शिक्षण मंडळाकडील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांना तसेच बालवाडी शिक्षण सेविका, शिक्षक, शिक्षण सेवक सन २०२१-२०२२ च्या मुळ वेतन + महागाई भत्ता यावर ८.३३% + विहीत दराने सानुग्रह अनुदान आदा करणेबाबत मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मान्यतेनुसार सदरचे कार्यालय परिपत्रक प्रसृत करण्यात येत आहे.
| यावर खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
१. पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी सेवक (रोजंदारी कामगारांसह) आणि माध्यमिक व तांत्रिक शिक्षण
विभागातील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांना प्राथमिक शिक्षण विभागाकडील शिक्षक, शिक्षकेतर सेवकांना बालवाडी शिक्षण
सेविका, शिक्षक तसेच शिक्षण सेवकांना सन २०२१-२०२२ च्या मूळ वेतन + महागाई भत्ता यावर ८.३३% + र.रु. १९,०००/- इतके सानुग्रह अनुदान उपस्थितीचे प्रमाणात आदा करण्यात यावे.
2. ज्या वर्षा करीता सानुग्रह अनुदान द्यावयाचे त्या वर्षांमध्ये संबंधीत सेवकांची (घाण भत्ता देय असणाऱ्या सेवकांसह)
कामावरील प्रत्यक्ष हजेरी किमान १८० दिवस असण्याची अट लागू राहील. तथापि फक्त कामावर असताना व काम करित
असताना घडलेल्या अपघातामुळे विशेष वैद्यकिय रजा एखाद्या सेवकांस द्यावी लागल्यास अशी रजा मनपा सेवाविनियमाच्या
मर्यादित हजेरी धरण्यात येईल.
३. किमान एक वर्ष शासकिय सेवा झालेल्या सेवकांची त्यापुढील आर्थिक वर्षातील हजेरी विचारात घेऊनच सानुग्रह अनुदान देय राहील.
४. सन २०२१-२०२२ साठी द्यावयाचे सानुग्रह अनुदानाबाबतच्या अन्य अटी व शर्ती तसेच सेवापुस्तक व वेतन बिलावर
ठेवावयाचे दाखले याबाबतचा तपशील सोबतचे परिशिष्टात दिलेला आहे, त्यानुसार तजवीज करावी. तसेच सोबतच्या
परिशिष्टानुसार संघटना निधीची कपात करण्यात यावी.
५. सर्व पात्र सेवकांना सानुग्रह अनुदान द्यावयाचे असल्याने सदरची बिले ऑडीट विभागातून दिनांक १८/१०/२०२२
अखेर पर्यंत तपासून घ्यावीत. सदरच्या रकमा बँक खात्यातून आदा होणार असल्याने त्याबाबतची आवश्यक ती संगणक
प्रणाली (व्हर्जन) सांख्यिकी व संगणक कार्यालयाकडून त्वरीत प्राप्त करून घ्यावी.
६. ज्या अधिकारी / सेवकांना सानुग्रह अनुदानातून आयकर व पुरसंचय निधी योजना लागू असलेल्या ज्या सेवकांना पुरसंचय
निधीची वर्गणी कपात करावयाची आहे त्यांनी त्याबाबतची पूर्वसुचना संबंधीत बिल लेखनिकांना देणे आवश्यक आहे. वरील प्रमाणे आयकर व पुरसंचय निधी वर्गणी कपात करण्याची सुविधा संगणक प्रणालीमध्ये करण्यात आली आहे.
७. माहे सप्टेंबर २०२२ चे वेतन संबंधीत सेवकास ज्या खात्याकडून देण्यात आले आहे. त्या खात्याने सानुग्रह अनुदान आदा करावयाचे आहे.
तरी, सन २०२१ – २०२२ या वर्षासाठी सानुग्रह अनुदान आदा करण्याकरीता वरीलप्रमाणे पुर्तता करणेविषयी सर्व खाते
प्रमुख यांनी त्यांचे नियंत्रणाखालील सर्व संबंधीत बिल लेखनिकांना जरूर त्या सुचना देण्याची तजवीज करणे. असे ही आदेशात म्हटले आहे.
| या असतील अटी