Selfie with Navadurga |  “नवदुर्गाचा सन्मान” व “सेल्फी विथ नवदुर्गा” या कार्यक्रमांचे आयोजन | पुणे शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा नवरात्रोत्सवाच्या काळात उपक्रम

HomeUncategorized

Selfie with Navadurga |  “नवदुर्गाचा सन्मान” व “सेल्फी विथ नवदुर्गा” या कार्यक्रमांचे आयोजन | पुणे शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा नवरात्रोत्सवाच्या काळात उपक्रम

Ganesh Kumar Mule Sep 26, 2022 2:13 AM

Ajit Pawar | Ganeshotsav 2023 | राज्यात जोमदार पाऊस पडूदे आणि बळीराजा सुखी, समाधानी होऊ दे | अजित पवार यांचे गणपतीकडे मागणे
PMRDA | ‘पीएमआरडीए’च्या घरकुल योजनेसाठी अर्जाची मुदत वाढवली | १८ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची संधी
NCP Vs Gopichand Padalkar | आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा | राष्ट्रवादी काँग्रेसचे पोलिसांना निवेदन

 “नवदुर्गाचा सन्मान” व “सेल्फी विथ नवदुर्गा” या कार्यक्रमांचे आयोजन

| पुणे शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा नवरात्रोत्सवाच्या काळात उपक्रम

नवरात्रउत्सवाचे औचित्य साधून या वर्षी पुणे शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नवदुर्गांचा सन्मान करण्यात येणार आहे.

यामध्ये देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, बारामती टेक्सटाइलच्या अध्यक्षा सौ.सुनेत्राताई पवार, स्कील डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटीच्या सहकुलपती डॉ. स्वाती मुजुमदार, भारती विद्यापीठ इंटरनॅशनल विभागाच्या डॉ. किर्ती महाजन, केसरी टुर्स अॅण्ड ट्रॅव्हलच्या संचालिका झेलम चौबळ-पाटील, धारिवाल फाउंडेशनच्या अध्यक्षा जानव्ही धारिवाल, बीव्हीजी ग्रुपच्या संचालिका वैशाली गायकवाड, अभिनव फार्मर कल्बच्या पूजा ज्ञानेश्वर बोडके, पुणे महानगर पालिकेच्या मुख्य वित्त अधिकारी उल्का कळसकर यांचा सन्मान करणार येणार आहे. विशेष म्हणजे हा सन्मान ९ दिवस या ९ नवदुर्गांच्या निवासस्थानी जाऊन करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहराध्यक्षा सुषमा सातपुते यांनी सांगितले आहे.

तसेच नवरात्रीच्या निमित्ताने पुणे शहरातील सर्व महिला भगिनींसाठी “सेल्फी विथ नवदुर्गा” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महिला भगिनींनी नऊ दिवस आपले विविध वेशभूषांमधील देवी सोबतचे फोटो #selfiewithnavdurga या हॅशटॅगसह फेसबुक व इंस्टाग्राम वर पोस्ट करावयाचे आहे. तसेच हे फोटो ९१७२९५९२२२ / ९१७५२२८३३३ या क्रमांकावर व्हाट्सॲप देखील करायचे आहेत. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट नऊ विजेत्यांना दररोज नऊ पैठण्या देण्यात येतील. असे एकूण ८१ पैठन्यांचे बक्षीस या स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेले आहे.

‘आपल्या महाराष्ट्राच्या भूमीची, इथल्या मातीची खास अशी ओळख आहे. भक्ती आणि शक्ती यांच्या स्पर्शाने या भूमीला, इथल्या मातीला आकार दिलेला आहे. विक्रम आणि वैराग्य जिथे एकत्र नांदते असे या भूमीचे खास वैशिष्ट्ये आहे. शूरवीर आणि संतांच्या मातीमध्ये जग घडविणाऱ्या स्त्रियांचा खूप मोठा वारसा लाभलेला आहे, ज्ञानदेवांची मुक्ताई, शिवबाची जिजाई, रणरागिनी लक्ष्मीबाई, जोतिबांची सावित्रीबाई आणि बाबासाहेबांची रमाई अशी महाराष्ट्राच्या मुलींची समृद्ध परंपरा आहे. अशा कितीतरी स्त्रियांनी स्वत:चं आयुष्य घडविलंच; पण त्याचबरोबर कुटुंबाला, समाजालाही घडविले. महाराष्ट्राला ललामभूत ठरलेल्या अशा या ‘महाराष्ट्र कन्यारत्नांच्या समृद्ध खाणीतली अनमोल कन्यारत्न या सर्व महिला आहे. यांच्या सन्मान सोहळ्याचा मुख्य उद्देश म्हणजे या सन्मान कार्यक्रमामुळे समाजातील इतर मुलींना व महिलांना प्रेरणा मिळावी हा आहे.तसेच “सेल्फी विथ नवदुर्गा” या स्पर्धेच्या माध्यमातून घर बसल्या माझ्या सर्व माता भगिनींना शहर स्तरावरील स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.तरी पुणे शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे”,असे आवाहन पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले आहे.