PFI Vs BJP | पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संस्थेवर बंदी घाला | पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणार्‍या देशद्रोहींवर कठोर कारवाई करा | पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना पुणे शहर भाजप ने दिले निवेदन

HomeपुणेBreaking News

PFI Vs BJP | पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संस्थेवर बंदी घाला | पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणार्‍या देशद्रोहींवर कठोर कारवाई करा | पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना पुणे शहर भाजप ने दिले निवेदन

Ganesh Kumar Mule Sep 26, 2022 2:04 AM

Raj Thackeray | अयोध्या दौऱ्याला विरोध हा ट्रॅप; राज ठाकरेंचा रोख कुणाकडे? | मुख्यमंत्री, संजय राऊत, आदित्य ठाकरे बद्दल काय म्हणाले राज ठाकरे? 
NCP Parisanvad Yatra : Sharad pawar : Kolhapur : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनो सत्तांध भाजपला उखडून टाका : शरद पवार यांचा घणाघात
Dr Kumar Ketkar | भाजपकडून धार्मिक द्वेष पसरवण्यासह मतांचे ध्रुवीकरणाचे काम | डॉ. कुमार केतकर यांचे प्रतिपादन

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संस्थेवर बंदी घाला

| पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणार्‍या देशद्रोहींवर कठोर कारवाई करा

| पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना पुणे शहर भाजप ने दिले निवेदन

पुणे |  रा. स्व. संघ परिवारातील संस्था, भाजप आणि शहरातील सामाजिक संस्था यांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची पोलिस आयुक्त कार्यालयात भेट घेतली. पाकिस्तान जिंदाबाद घोषणा देणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी ही भेट घेतली.

भाजपने दिलेल्या निवेदनानुसार ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संस्थेवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केलेल्या कारवाईविरोधात शुक्रवारी, २३ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी सहा वाजता पुणे शहर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान काही समाजकंटकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी ६० ते ७० जणांचा बेकायदेशीर जमाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनधिकृतपणे जमा झाला होता.

कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणणे आणि देशाच्या विविध भागांत अंतर्गत जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडविण्याच्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संस्थेचा उद्देश स्पष्ट होतो.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संस्थेवर तातडीने बंदी घालण्यात यावी आणि
पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणार्‍या सर्व कार्यकर्त्यांवर तातडीने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही या निवेदनाद्वारे करीत आहोत. असे भाजपने म्हटले आहे.

शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनिल कांबळे, योगेश टिळेकर, मुरलीधर मोहोळ, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येंपुरें, दिपक नागपुरे, दिपक पोटे, संदिप लोणकर, दत्ताभाऊ खाडे, गणेश बिडकर, धीरज घाटे, सुशिल मेंगडे, संघाचे महेश पोहणेरकर, धनंजय काळे, बजरंग दलाचे पदाधिकारी, विश्व हिंदू परिषद पदाधिकारी यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.