Hadapsar | Animal Hospital | हडपसर मधील नियोजित प्राणी हॉस्पिटलच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन  | हॉस्पिटल हलवण्याची मागणी

HomeBreaking Newsपुणे

Hadapsar | Animal Hospital | हडपसर मधील नियोजित प्राणी हॉस्पिटलच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन | हॉस्पिटल हलवण्याची मागणी

Ganesh Kumar Mule Sep 22, 2022 2:06 PM

Hadapsar Animal Hospital | विरोध होऊनही हडपसर प्राणी  हॉस्पिटलचा  प्रस्ताव मुख्य सभेत मंजूर | महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांचा निर्णय
Pune | Animal Hospital | हडपसर ला होणार प्राण्यांचे हॉस्पिटल!  | भटक्या कुत्र्यांचाही केला जाणार बंदोबस्त 
Animal Hospital | हडपसर प्राणी  हॉस्पिटल प्रस्ताव मंजूर | मात्र  हडपसर मधून विरोध वाढला

हडपसर मधील नियोजित प्राणी हॉस्पिटलच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

| हॉस्पिटल हलवण्याची मागणी

हडपसर मतदारसंघातील रामटेकडी येथे कचरा डेपो शेजारीच पुणे महानगरपालिका मोकाट कुत्र्यांच्या उपचारासाठी हॉस्पिटल बांधत आहे. अगदी कचरा डेपो शेजारी होत असलेल्या या हॉस्पिटलमुळे प्राणीमित्रांच्या आरोग्याचा प्रश्न सुटण्याऐवजी वाढणार आहे. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले. तसेच सदर हॉस्पिटल योग्य ठिकाणी हलविण्याची मागणी करण्यात आली.

याबाबत शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले कि, पुणे शहरात पाळीव प्राण्यांची संख्या मोठी आहे. त्यात प्रामुख्याने कुत्र्यांची संख्या सर्वाधिक आहे. या कुत्र्यांची गणना व्हावी. त्यांना आरोग्य व व्हॅक्सिनेशनच्या सर्व सुविधा मिळाव्यात, अशी मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली. हडपसर रामटेकडी येथे होणारे हॉस्पिटल कचरा डेपो शेजारीच असल्याने येथे उपचारासाठी येणाऱ्या प्राण्यांना विविध प्रकारच्या विषाणूंची लागण होण्याची शक्यता आहे. ही शक्यता पाहता सदर जागेत प्राण्यांचे हॉस्पिटल होणे हे अतिशय धोकादायक ठरू शकते. हडपसर परिसरात सातत्याने अश्या प्रकारचे प्रकल्प येत असल्याने पुढील काळात हडपसर परिसरातील नागरिकांना त्यांच्या विकास कामांसाठी जागाच शिल्लक राहणार नसल्याचा धोका आहे.

शहरातील इतर भागात स्वच्छ ठिकाणी सदर हॉस्पिटल हलवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रयत्नशील आहे. तश्या आशयाचे निवेदन आयुक्तना देण्यात आले असून याबाबत तातडीने पुनर्विचार करणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले.

या आंदोलनासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार श्री.चेतन तुपे ,माजी महापौर वैशालीताई बनकर , माजी नगरसेवक योगेश ससाणे,अशोक कांबळे,गफुर पठाण,प्रदीप देशमुख,मृणालिनी वाणी,रुपाली पाटील,डॉ. शंतनु जगदाळे,दिपक कामठे, आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.