पीएमपीच्या ई-बस डेपोचे शुक्रवारी उद्घाटन | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
‘पीएमपीएमएल’च्या पुणे स्टेशन ई-बस डेपोचा उद्घाटन समारंभ व ९० ई-बसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री महेंद्रनाथ पांडे यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २) पुणे स्टेशन स्थानकावर होणार आहे. या प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहतील.
केंद्र शासनाच्या फेम-२ योजनअंतर्गत प्राप्त होणाऱ्या १५० ई-बसेससाठी प्रति बस ५५ लाख रूपये प्रमाणे अनुदान केंद्र सरकारने दिले आहे. बीआरटी लेन मधून धावणाऱ्या या ई-बसचे महत्वपूर्ण वैशिष्ट्ये म्हणजे त्या १२ मीटर लांब असून ३३ आसन क्षमतेच्या आहेत. संपूर्ण वातानुकुलित, दिव्यांगांसाठी खास सुविधा, आयटीएमएस, मोबाईल चार्जिंग या सुविधाही बसमध्ये आहेत. पुणे स्टेशन ई-बस डेपोतून बसेस हिंजवडी माण फेज ३, गोखलेनगर, आळंदी, विश्रांतवाडी, लोहगाव, मांजरी बु., रांजणगाव/कारेगाव, खराडी, विमाननगर, कोंढवा खुर्द, साळुंके विहार, चिंचवड गाव, शेवाळेवाडी या मार्गांवर धावणार आहेत.