महागाईकडे केंद्रातील सत्ताधारी जाणीवूपर्वक दुर्लक्ष करीत आहे
| खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप
घरखर्च भागवणे अवघड झाले आहे. मात्र केंद्र सरकारने जनतेच्या प्रश्नावर झोपेचे सोंग घेतले आहे त्याला जागवण्याचे काम राष्ट्रवादी रस्त्यावर येवून करेल. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने कोथरूडला महागाई प्रश्नावर जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. महागाईचा विषय देशातील सर्वसामान्य जनतेसाठी अत्यंत महत्वाचा आहे. मात्र, या विषयाकडे केंद्रातील सत्ताधारी जाणीवूपर्वक दुर्लक्ष करीत आहेत., असा आरोप खासदार सुळे यांनी यावेळी केला.
खासदार सुळे म्हणाल्या की, तुम्ही केले तर जन कल्याण विरोधकांनी केले तर रेवडी वाटप म्हणायचे. हा अन्याय आहे. केंद्र सरकारकडे असलेल्या यंत्रणांच्या फक्त राजकारण्यांनाच नव्हे तर मिडीयावाल्यांना सुध्दा नोटीसा जात आहेत. अटक केली जात आहे. संविधानाने, डॉ. आंबेडकरांनी जो हक्क दिला, तो आवाज दाबण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. भाजपाचे अध्यक्ष नढ्ढा म्हणतात की, एक पार्टी एक देश. आम्ही संविधान मानणारे आहोत. आम्ही एक देश अनेक पार्टी चा पुरस्कार करतो.
संयोजक शंकर केमसे म्हणाले की, या सरकारच्या काळात जगणं अवघड, मरण सोप झाले आहे. ज्वारी, मुग, साखर सगळेच महाग झाले. मोदीजी तुमच्या राज्यात स्वस्त काय आहे ते सांगा. खोटे बोलायचे पण रेटून बोलायचे एवढेच यांचे धोरण आहे म्हणून आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहोत.