Dhananjaya Thorat Adarsh ​​Worker’ Award | ‘कै.धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता’ पुरस्कार वेलणकर, मुखडे, खान यांना जाहीर !

HomeपुणेBreaking News

Dhananjaya Thorat Adarsh ​​Worker’ Award | ‘कै.धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता’ पुरस्कार वेलणकर, मुखडे, खान यांना जाहीर !

Ganesh Kumar Mule Aug 25, 2022 11:42 AM

Food Festival | पुण्यात तीन दिवस सवलतीच्या दरात खरेदी करा खाद्यपदार्थ  | जाणून घ्या महापालिकेच्या फूड फेस्टिवलविषयी 
PMRDA Draft DP | प्रारूप विकास आराखड्या बाबत पीएमआरडीएच्या आठ याचिका निकाली | उज्वल केसकर यांच्या याचिकावर २५ ऑगस्ट ला सुनावणी 
Dr Siddharth Dhende | धाराशिव मधील वाघोलीतील पुरग्रस्तांना मदतीचा हात – प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांचा पुढाकार ; डॉ. धेंडे यांचे मार्गदर्शन

‘कै.धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता’ पुरस्कार वेलणकर, मुखडे, खान यांना जाहीर !

कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते , व माजी नगरसेवक कै .धनंजय थोरात यांच्या स्मरणार्थ दिले जाणारे पुरस्कार यंदा सजग नागरिक मंच ,पुणेचे अध्यक्ष विवेक वेलणकर (२५ हजार रुपये व सन्मानचीन्ह), सुप्रसिद्ध तबलावादक पं पांडुरंग मुखडे (११००० रुपये व सन्मानचीन्ह), आणि कोरोना काळात बहुमोल कार्य करणारे उम्मत सामाजिक संस्थेचे जावेद इस्माईल खान(११००० रुपये व सन्मानचीन्ह) दिले जाणार आहे.

पुरस्काराचे यंदा १२ वे वर्ष असून , २६ ऑगस्ट हा धनंजय थोरात यांचा पुण्यस्मरण दिवस आहे. त्यानिमित्त कै .धनंजय थोरात स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी यांनी हे पुरस्कार जाहीर केले .
विवेक वेलणकर हे सजग नागरिक मंच ,पुणेचे अध्यक्ष असून पंधरा वर्षांचा भारत व अमेरिकेतील औद्योगिक व संगणक क्षेत्रात अनुभव.गेली वीस वर्षे स्वतःची सॉफ्टवेअर रिकूटमेंट फर्म,पर्यटक ,सचिव व माजी नगरसेवक,विविध वृत्तपत्रांतून करीअर, कॉम्प्युटर, स्वयंरोजगार व सामाजिक विषयांवर हजाराहून अधिक लेख प्रसिद्ध, महाराष्ट्रातील विविध भागांत करीअर मार्गदर्शनपर नऊशेहून अधिक व्याख्याने,शेकडो विद्यार्थ्यांना करीअर काऊन्सेलिंग करणारे हरहुन्नरी व्यक्तिमत्व असणारे ते उत्तम सामाजिक कार्यकर्ते आहेत.
सुप्रसिद्ध तबलावादक पं.पांडुरंग मुखडे एम. ए. (मराठी), पुणे विद्यापीठ संगीत अलंकार , हार्मोनियम,संगीत विशारद गायनपं. के. एन. बॉळगे गुरुजी श्री. भीमराव कनकधर उस्ताद गुलाम रसुल खाँ साहेब यांचे गंडाबंधित शिष्य व भारतातील अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या अनेक दिगाज कलावंतांना तबल्याची खुम्सदार सत्र्ह्संगत करून रसिकांची मने जिंकलेले खातानाम तबलावादक आहेत.
जावेद इस्माईल खान उम्मत सामाजिक संस्था,उस्मानिया मस्जिद ट्रस्ट कॅम्प, पुणेचे विश्वस्त ,नवरंग युवक मित्र मंडळ, माजी अध्यक्ष ,नवरंग नवरात्र ग्रुप. संस्थापक व अध्यक्ष असून ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. तसेच पुणे शहरात होणाऱ्या सार्वजनिक गणेश उत्सवात जावेद खान हिंदू मुस्लीम सलोखा अभादित रहावा यासाठी कायम अग्रेसर व कार्यरत असतात.
यंदा या तिघांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत .