Traffic Congestion in Vadgaonsheri | वडगावशेरी मतदारसंघातील वाहतूक कोंडी |आमदार सुनिल टिंगरे यांच्याकडून विविध ठिकाणी पाहणी

HomeBreaking Newsपुणे

Traffic Congestion in Vadgaonsheri | वडगावशेरी मतदारसंघातील वाहतूक कोंडी |आमदार सुनिल टिंगरे यांच्याकडून विविध ठिकाणी पाहणी

Ganesh Kumar Mule Aug 10, 2022 3:02 PM

Nagar Road BRTS | नगर रस्ता सिग्नल फ्री करणार |आमदार सुनिल टिंगरे
Akshay Tritiya | श्री.लक्ष्मीमाता मंदिरात तीन हजार हापूस आंब्यांची आकर्षक आरास | भक्तिमय वातावरणात दर्शनासाठी भाविकांची रीघ
Kasba Peth by-election | कसबा पेठ पोटनिवडणुक | कॉंग्रेसच्या १६ इच्छुकांनी दिल्या मुलाखती

वडगावशेरी मतदारसंघातील वाहतूक कोंडी |आमदार सुनिल टिंगरे यांच्याकडून विविध ठिकाणी पाहणी

 

    वडगावशेरी मतदारसंघातील विमाननगर, कल्याणीनगर व पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळच्या जवळ असणाऱ्या रस्त्यांची पाहणी आमदार सुनिल टिंगरे यांनी पुणे वाहतूक पोलीस व पुणे महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांसोबत पाहणी केली.
या पाहणी दौर्‍या दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळकडे जाणारी व विमानतळवरुन येणारी वाहतूक ही प्रामुख्याने 509 चौका मधून होत असते. यामुळे 509 चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होऊन नागरिकांचा पुष्कळ वेळ वाहतूक कोंडी मध्ये जातो. याचा दैनंदिन नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता आमदार सुनिल टिंगरे यांनी 509 चौकाची पाहणी करुन वाहतूक पोलीस व पुणे महानगरपालिकेचे पथ विभागाचे अधिकार्‍यांना 509 चौकात अनेक ठिकाणी रुंदीकरण करणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आणुन दिले.
तसेच 509 चौक ते स्काय बेलवेडेरे सोसायटी, विमाननगर कडे जाणार्‍या रस्त्याच्या ठिकाणी रुंदीकरण करणे व तात्पुरते दुभाजक बसविणे आवश्यक असल्याचे आमदार सुनिल टिंगरे यांनी संबंधित पोलिस व पुणे मनपा अधिकार्‍यांना सांगितले. तसेच 509 चौकाचे सर्व बाजूंनी रुंदीकरण करण्याचे निर्देश संबंधित पुणे महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांना आमदार सुनिल टिंगरे यांनी दिले. 509 चौकाचे रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतर नक्कीच वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल असा विश्वास आमदार टिंगरे यांनी व्यक्त केला.
 आमदार सुनिल टिंगरे यांनी बोलविलेल्या संयुक्त बैठकी मध्ये विमाननगर व कल्याणीनगर मधील नागरिकांनी वाहतूक पोलीस उपायुक्त समोर थेट आपल्या समस्या मांडल्या.
            मंगळवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी कल्याणीनगर आणि विमाननगर येथे आमदार सुनिल टिंगरे, वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, वाहतूक पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, वाहतूक पोलिस निरीक्षक जय राम पायगुडे,  KNRA (कल्याणीनगर रेसीडंट असोसिएशन)चे सभासद, विमाननगर व कल्याणीनगर मधील नागरिकांच्या संयुक्त बैठका पार पडल्या.
      या बैठकी मध्ये कल्याणीनगर येथील सेंट्रल एव्हेन्यू रोड ते डी’मार्ट रोडवर पार्किंगची उपलब्धता करने, वाहतूक पोलिसांकडून आकारण्यात येणारे भरमसाट टोईंग शुल्क बंद करावे, बेकायदेशीर बॅरीकेट्स लाऊ नये तसेच यासारख्या भेडसावणाऱ्या विविध समस्या नागरिकांनी मांडल्या. तसेच विमाननगर येथे घेण्यात आलेल्या बैठकी मध्ये विमाननगर मधील अनेक चौकांमधील होणारी दैनंदिन वाहतूक कोंडीमूळे येथील नागरिकांना खूप गैरसोय होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. वाहतूक कोंडी होत असलेल्या चौकांमध्ये वाहतूक पोलीस उपलब्ध करून देणे व नागरिकांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश आमदार सुनिल टिंगरे यांनी पोलिस प्रशासनाला दिले.
         बैठकी मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यावर निशचितपणे वाहतूक कोंडीचे कमी होईल व नागरिक होणारा त्रास हा मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल असे आमदार सुनिल टिंगरे यांनी सांगितले.
         या वेळी आमदार सुनिल टिंगरे, वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, वाहतूक पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, वाहतूक पोलिस निरीक्षक जय राम पायगुडे, पुणे मनपा पथ विभागाचे उपअभियंता अमर मतीकूंड, कनिष्ठ अभियंता तांबारे, KNRA (कल्याणीनगर रेसीडंट असोसिएशन)चे सभासद, विमाननगर व कल्याणीनगर मधील नागरिक, नानासाहेब नलवडे, माजी नगरसेविका मीनल सरवदे, सुहास टिंगरे, सोनसिंग सोना, आनंद सरवदे, अजय बल्लाल, राकेश म्हस्के व मनोज पाचपुते उपस्थित होते.