Marathi  Din | 1 ऑगस्ट मराठी दिन साजरा करावा म्हणून  सरकार सोबत भांडत आहोत |  श्रीमंत कोकाटे

HomeपुणेBreaking News

Marathi Din | 1 ऑगस्ट मराठी दिन साजरा करावा म्हणून  सरकार सोबत भांडत आहोत |  श्रीमंत कोकाटे

Ganesh Kumar Mule Jul 17, 2022 1:49 PM

PMC : लहुजी वस्ताद फिटनेस क्लब होणार सील : मुख्य सभेत निर्णय 
Health Camp | साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती निमित्त मातंग एकता आंदोलनच्या वतीने आरोग्य शिबिर 
Prabhag NO 19 | श्री संत संताजी महाराज जगनाडे उद्यानाचे लोकार्पण 

1 ऑगस्ट मराठी दिन साजरा करावा म्हणून  सरकार सोबत भांडत आहोत |  श्रीमंत कोकाटे

अण्णाभाऊ साठे यांचे मराठी साहित्यातील योगदान पाहता, 1 ऑगस्ट हा मराठी दिन म्हणून साजरा करावा, त्यासाठी आम्ही राज्य सरकार कडे अनेक वर्ष भांडत आहोत, असे डॉ श्रीमंत कोकाटे यांनी सांगितले.

मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य या राज्यव्यापी संघटनेच्या विद्यमाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या ५३ व्या पुण्यतिथी निमित्त रविवार २ रोजी स्व. ठाकरे कलादालन, सारसबाग, पुणे या ठिकाणी  श्रीमंत कोकाटे साहेब यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये १० व १२ वी च्या गुणवंत विद्यार्थाचा ज्यांनी प्रतिकूल परिस्थिती मध्ये शिक्षण घेऊन चांगले गुण मिळविले त्यांचा संस्थापक अध्यक्ष व मा. गृहराज्य मंत्री रमेशदादा बागवे यांनी सत्कार केला. तसेच अण्णाभाऊ साठेच्या लेखनातून प्रेरणा घेऊन अनेक युवकांनी समाज कार्य केले पाहिजे व जीवनात कितीही कठीण प्रतिकूल परिस्थिती असली तरीही संघर्ष करून पुढे जाण्याचे सामर्थ्य अण्णाभाऊ साठेच्या लेखनातून घ्यावे असे आवाहन रमेशदादा बागवे यांनी सर्व विद्यार्थांना केले.

आपल्या जीवनातील संकटाला संधी बनवून जीवनाची वाटचाल करणारा लेखक म्हणजे अण्णा भाऊ साठे. असे मत श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांना सात समुद्र पार कोणी नेले असेल तर अण्णा भाऊ नी. रशिया च्या स्टालिनगार्ड मध्ये शिवाजी महाराजांचा शौर्य सादर करणारा पौवाडा गायला व त्याची महानता तिथे सांगितली हा इतिहास आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे.

या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक माजी नगरसेवक अविनाश बागवे होते. या कार्यकमाचे प्रास्ताविक विठ्ठल थोरात यांनी केले तर सूत्र संचालन अरुण गायकवाड यांनी केले. या प्रसंगी मातंग समाज चे ज्येष्ठ नेते यादवराव सोनावणे, डॉ सुहास नाईक, विठ्ठल गायकवाड, महिला आघडीच्या अध्यक्षा ॲड. राजश्री ताई अडसूळ, सौ सुरेखा खंडाळे , संजय साठे , दयानंद अडागळे, सुनील बावकर, हुसैन शेख, रोहित अवचीते, यांनी विशेष परिश्रम घेतले.