डेक्कन सहित शहरात महत्वाच्या ठिकाणी बहुमजली पार्किंग करा
| खासदार गिरीश बापट यांची महापालिकेला सूचना
पुणे | शहरात पार्किंग ची समस्या वाढताना दिसत आहे. याच अनुषंगाने खासदार गिरीश बापट यांनी डेक्कन सहित शहरात महत्वाच्या ठिकाणी बहुमजली पार्किंग करा, अशी सूचना महापालिकेला केली आहे. यावर महापालिका आयुक्तांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
शहरातील विविध प्रश्नावर खासदार गिरीश बापट महापालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यासोबत बैठक घेतली. यावेळी बापट यांनी उक्त सूचना केली. याच बैठकीत बापट यांनी जायका योजनेचा आढावा घेतला. जायका योजनेचे काम लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. या बाबतच्या सगळ्या प्रक्रिया जवळपास पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे हे काम लवकर पूर्ण करण्याची अपेक्षा बापट यांनी व्यक्त केली. तसेच यावेळी मेट्रोच्या काही प्रलंबित जागांबाबत देखील चर्चा झाली.
महापालिकेने MNGL कंपनीकडे शहरातील स्मशानभूमीत कनेक्शन देण्याची मागणी केली आहे. मात्र बिबवेवाडी वगळता इतर कुठल्याही ठिकाणी हे कनेक्शन देण्यात आलेले नाही. बैठकीत हा विषय आल्यांनतर खासदार बापट यांनी MNGL च्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केली.