“कंत्राटी कामगारांना कायम कामगारांचा पगार द्या”
-कामगार नेते सुनील शिंदे
पुणे | कंत्राटी कामगारांना कायम कामगार प्रमाणेच सर्व सेवा सवलती व पगार मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय मजदूर संघ कटिबद्ध असेल असे कामगार नेते सुनील शिंदे यांनी यावेळी सांगितले. ते मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला तर त्यासाठी चालकांनी तयार रहावे, असे यावेळी शिंदे यांनी सांगितले.
पुणे महानगर पालिकेतील कंत्राटी चालकांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात पुणे महानगरपालिकेतील विविध आस्थापनांमध्ये काम काय करणारे कंत्राटी चालक उपस्थित होते. मेळाव्यापूर्वी राष्ट्रीय मजदूर संघाचा नाम फलकाचे उद्घाटन व्हेईकल डेपो, गुलटेकडी मार्केट यार्ड येथे कामगार नेते सुनील शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर कंत्राटी चालकांचा मेळावा पार पडला.
मेळाव्याचे सूत्रसंचालन राष्ट्रीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण यांनी केले. आभार प्रदर्शन संघटनेचे सेक्रेटरी एस के पळसे यांनी केले.
या मेळाव्यामध्ये चालकांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्याय, अत्याचार यांबाबत माहिती दिली. सर्वांपासून संरक्षण देण्याची व कामगार कायद्यातील सर्व फायदे मिळवून देण्याची मागणी केली.
कामगार नेते सुनील शिंदे यांनी या सर्व कंत्राटी कामगारांना कोणीही कामावरून काढणार नाही, यासाठी संघटना सदैव तत्पर राहील, असे सांगितले. सर्व कंत्राटी चालकांना, कामगार कायदा प्रमाणे मिळणारे सर्व फायदे मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकारी यांच्याकडे बैठक घेऊन प्रश्न सोडवू असे त्यांनी सांगितले. चालकांच्या प्रश्नांसाठी जर प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, तर मोठे आंदोलन देखील छेडण्याचा इशारा यावेळी शिंदे यांनी दिला. देशातच कंत्राटीकरण चालू असून या कंत्राटी कंत्राटी कामगारांवर अन्याय करणारी धोरणच केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडून आखले जात आहे, ही कामगार क्षेत्र बाबत अतिशय गंभीर बाब आहे. त्याचा राष्ट्रीय मजदूर संघातर्फे निषेध करण्यात येत आहे.
कंत्राटी कामगारांना कायम कामगार प्रमाणेच सर्व सेवा सवलती व पगार मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय मजदूर संघ कटिबद्ध असेल असे यावेळी त्यांनी सांगितले. ते मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला तर त्यासाठी चालकांनी तयार रहावे, असे यावेळी सांगितले.